घरमुंबईपनवेलमध्ये ६७१ गोविंदांचा थरार; खासगी ६४३ तर सार्वजनिक २८ दहीहंड्या

पनवेलमध्ये ६७१ गोविंदांचा थरार; खासगी ६४३ तर सार्वजनिक २८ दहीहंड्या

Subscribe

पनवेल शहरासह तालुक्यात आज, शनिवारी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. मंडळांकडून या उत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली असली, तरी पोलिसांच्या परिमंडळ एक व दोनमध्ये हा उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या धूमधडाक्‍यात साजरा केला जातो. यंदा ६७१ मंडळे या उत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये लहान मंडळे ६४३, तर मोठ्या मंडळांची संख्या २८ इतकी आहे. या वर्षीही दहीहंडी उत्सवामध्ये आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कारवाईचा बडगा पोलिसांकडून उगारला जाऊ शकतो. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४ मंडळांनी या उत्सवामध्ये सहभाग घेतला नाही. या मंडळांकडून उत्सवासाठी जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली जात असल्यामुळे यावर्षीच्या दहिहंडीमध्ये या मंडळांनी आपला जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १२५ खासगी दहीहंड्या तर ९ सार्वजनिक दहीहंड्यांचे प्रमाण आहे. तसेच खांदेश्वर, कामोठे आणि कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १४ सार्वजनिक दहीहंड्या तर १५० खासगी दहिहंड्यांचा समावेश आहे. तर खारघर आणि तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ५ सार्वजनिक दहीहंड्यांसह १७८ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये तालुक्याचा ग्रामीण भाग येत असल्यामुळे याठिकाणी सार्वजनिक दहीहंड्या साजऱ्या केल्या जात नसल्या तरी १९० खासगी दहीहंड्या याठिकाणी फोडल्या जात आहेत. दहीहंडी हा सण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. आजमितीला प्रत्येक विभागातून विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. हा एक प्रकारचा खेळ असला तरी हा खेळ जीवनघेणा खेळ असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाकडून या खेळावर सन २०१४ साली बंधने घालण्यात आली आहेत.

- Advertisement -

अनेकदा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे तरुण थरावरून कोसळून जखमी होतात. यात फोडणाऱ्याच्या जीवावरही बेतू शकते. २०१२ साली जवळजवळ २२५ गोविंदा जखमी झाले होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम तयार केले आहेत.

हे आहेत नियम 

  • २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने १२ वर्षाखालील मुलांनी दहीहंडीत सहभागी होऊ नये असे फर्मान काढले
  • यानंतर उच्च न्यायालयाने यासाठीची वयोमर्यदा कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असली पाहिजे. दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदाची वयाची १८ वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत
  • २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी होता येणार नाही
  • थरांवरच्या उंचीबाबतही आधी न्यायालयाने निर्बंध घातले होते, पण २०१७ मध्ये ते शिथील करण्यात आले
  • राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, १४ वर्षांखालील मुलांना बालकामगार कायदा (१९८६) नुसार दहीहंडी स्पर्धेत सहभागी होऊ दिले जाणार नाही
  • न्यायालयाने दहीहंडीसाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्याची उंचीची मर्यादा किती असावी हे स्पष्ट केलेले नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -