घरमुंबईमनसेचे अनोखे आंदोलन; कांजूरमार्गच्या खड्ड्यात सोडले खेकडे

मनसेचे अनोखे आंदोलन; कांजूरमार्गच्या खड्ड्यात सोडले खेकडे

Subscribe

कांजूरमार्ग परिसरातील ६० फूट रोडवर दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पहिल्याच पावसात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरणाच्या बाबतीत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद मुंबईत ही उमटत आहेत. रविवारी कांजूरमार्ग रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून खेकडे सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खेकडे आंदोलन केलं होतं. त्यानंतर रविवारी मनसेकडून खेकडे आंदोलन केलं गेलं. कांजूरमार्ग परिसरातील ६० फूट रोडवर दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पहिल्याच पावसात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्याचा निषेध करण्यासाठी रविवारी मनसे विक्रोळी विधानसभा तर्फे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात खेकडे सोडून अनोखे आंदोलन करण्यात आले.

मनसेचे खेकडा आंदोलन

लवकरात लवकर पालिका प्रशासनाने हे खड्डे बुजवून रस्ते सुरक्षित करावे अन्यथा मनसेतर्फे आंदोलन तीव्र करण्यात येईल.
– विनोद शिंदे, विधानसभा अध्यक्ष, मनसे

- Advertisement -

यावेळी काही खेकड्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका, रस्ते कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी खेकड्यांच्या पाठीवर नाव लिहिलेले खेकडे खड्ड्यात सोडले. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मनसे विक्रोळी विधानसभा तर्फे खड्ड्याचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने या अनोख्या आंदोलनाची वेळीच दखल घेऊन रस्त्याची डागडुजी केली होती. पण मुंबईत काही दिवस झाले संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे पुन्हा तसेच खड्डे रोडवर दिसल्यामुळे रविवारी हे आंदोलन करण्यात आले.

तिवरे धरण दुर्घटना – मनसेने कांजूरमार्गच्या खड्ड्यांमध्ये सोडले खेकडे

तिवरे धरण दुर्घटना – मनसेने कांजूरमार्गच्या खड्ड्यांमध्ये सोडले खेकडे

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಜುಲೈ 7, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -