घरCORONA UPDATEटीएमटीची बस झाली कोरोना ॲम्ब्युलन्स; बोलवण्यासाठी इथे कॉल करा!

टीएमटीची बस झाली कोरोना ॲम्ब्युलन्स; बोलवण्यासाठी इथे कॉल करा!

Subscribe

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना कोव्हीड १९ रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी टीएमटीच्या बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून आजपासून ५ बस ॲम्ब्युलन्स कोरोना विरूद्धच्या लढाईत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व बसेसमध्ये तीन पाळ्यांमध्ये ब्रदर्स आणि अटेंडंटची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

tmt bus ambulance

- Advertisement -

कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करताना त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची वानवा भासू नये या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सिंघल यांनी हा निर्णय घेतला असून ठाणे परिवहनच्या दहा बसेस आता ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणार आहेत. एका बसमध्ये दोन बेडस् बसवण्यात आले असून ड्रायव्हरच्या केबिनपासून ॲम्ब्युलन्सचा भाग पार्टिशनच्या साहाय्याने पूर्णतः स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. सदरच्या बस ॲम्ब्युलन्स तीन पाळ्यांमध्ये चालवण्यात येणार असून या प्रत्येक बसेमध्ये प्रत्येक पाळीमध्ये एक ब्रदर आणि एक अटेंडंट नियुक्त करण्यात आले आहेत. यातील पहिल्या ५ बस ॲम्ब्युलन्स रविवारी सायंकाळपासून सेवेत रूजू होत असून उर्वरित ५ बसेस सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे याचे नियंत्रण ठेवण्यात आले असून या सेवेसाठी ०२२-२५३९९८२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -