घरमुंबईमेडिकल दुकानांवर केमिस्टऐवजी फार्मसी लिहिणार!

मेडिकल दुकानांवर केमिस्टऐवजी फार्मसी लिहिणार!

Subscribe

औषधांच्या दुकानांवर केमिस्ट आणि ड्रगिस्ट लिहिलेलं नाव यापुढे फार्मसी असं लिहिलं जाईल

औषधांच्या दुकानांवर लवकरच फार्मसी असं लिहिलं जाणार आहे. आतापर्यंत औषधांच्या दुकानांवर केमिस्ट आणि ड्रगिस्ट लिहिलेलं आहे. पण, आता फार्मसी असं लिहिलं जाईल. कर्नाटक स्टेट रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनकडून औषधांच्या दुकानांवर ‘फार्मसी’ लिहिण्यात यावं अशी विनंती केली होती. त्यानुसार, औषधविषयक सल्लागार समितीने सरकारला याबाबत शिफारस केली आहे.

कर्नाटक स्टेट रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनने ड्रग आणि कॉस्मेटीक १९४५ कायद्यातील ६५(१५)(बी) या नियमामध्ये औषध दुकानांवर असलेल्या केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट हे नाव बदलून फार्मसी करण्यात यावं ही विनंती केली होती. जेणेकरून फार्मासिस्टचा दर्जा वाढण्यास मदत होईल.

यासंदर्भात महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे म्हणाले, “ जगभरात औषधांच्या दुकांनावर केमिस्ट किंवा ड्रगिस्ट असं लिहिलेलं नसतं. सगळीकडे फार्मसी असं लिहिलेलं असतं. भारतात तसं नाही. भारतामध्येही तसंच व्हावं आणि फार्मासिस्टचा दर्जा वाढावा यासाठी औषधविषयक सल्लागार समितीने कर्नाटक सरकारकडे मागणी केली होती. असं झालं तर फार्मासिस्टचा दर्जा वाढेल. शिवाय त्यांना एक सन्मान ही मिळेल. त्यामुळे हे एक चांगलं पाऊल आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -