घरमुंबईआचारसंहितेमुळे का होईना मुंबई राजकीय बॅनरमुक्त झाली!

आचारसंहितेमुळे का होईना मुंबई राजकीय बॅनरमुक्त झाली!

Subscribe

मुंबईत राजकीय बॅनरबाजीला बंदी असतानाही गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या अनधिकृत फलकांमुळे शहराला बकालपणाचे स्वरुप आले होते. परंतु रविवारी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर अखेर या राजकीय फलकांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होताच विविध भागांतील राजकीय फलक धडाधड खाली उतवण्यासाठी महापालिका कर्मचार्‍यांचे हात पुढे सरसावले. त्यामुळे आचारसंहितेमुळे का होईना मुंबई बॅनरमुक्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबईत राजकीय पक्षांकडून लावल्या जाणार्‍या बॅनर तथा फलकांबाबत न्यायालयाने राजकीय पक्षांना दंडात्मक कारवाई केल्यानंतरही या जाहिरातबाजीला आळा बसला नाही. उलट लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे उद्घघाटन तथा भूमीपुजन तसेच लोकार्पण आदी कार्यक्रमांची जाहिरातबाजी मोठ्याप्रमाणात सुरू होती. मुंबईतील प्रत्येक रस्ता आणि चौक तसेच विजेचे खांब हे राजकीय फलकांनी व्यापून निघाले होते. महापालिकेच्यावतीने कारवाई सुरू असली, तरी प्रत्यक्षात राजकीय बॅनरबाजीला आळा घालण्यास महापालिकेला अपयश येत होते.

- Advertisement -

परंतु, रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे, आचारसंहितेचे कारण देत महापालिकेने सर्वच विभागांतील राजकीय बॅनरबाजी हटवण्याची मोहीम हाती घेतली. सर्वच विभागांना आदेश दिल्यामुळे प्रत्येक विभागातील राजकीय बॅनर खाली उतरवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे बॅनर हटवण्याची कार्यवाही सुरू होती. महापालिका उपायुक्त विजय बालमवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -