घरमुंबईमतदारांना उपयोगी पडणार्‍या ‘लोकतंत्र’ चे आज उद्घाटन

मतदारांना उपयोगी पडणार्‍या ‘लोकतंत्र’ चे आज उद्घाटन

Subscribe

मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र आजची तरुण पिढी मतदानाबाबत उदासिन दिसते. मतदानासाठी मिळालेल्या सुट्टीचा वापर मतदान न करता मौजमजेसाठी करण्याकडे तरुणाईचा कल असतो. तरुणांमधील ही उदासिनता दूर करून जास्तीतजास्त तरुणांना मतदानासाठी प्रवृत्त करणे ही लोकशाहीची गरज आहे. मात्र मतदानाबद्दल माहितीच्या अभावी तरुणांना मतदान करण्याची नोंदणी कुठे करायची? आपला मतदार संघ कोणता? मतदार संघातील उमेदवार कोण आहेत? किंवा कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे असे अनेक प्रश्न पडतात. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या सहज, सुलभ आणि त्वरीत उपलब्ध होणार आहेत.

लोकंतत्र या वेबसाईटवर एका क्लिकसह. लोकतंत्र या वेबसाईटचे उद्घाटन शनिवारी दुपारी तीन वाजता, मुंबई पत्रकार संघ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे होणार आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमाला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, भाजप युवा मोर्चाचे मुंबई,अध्यक्ष मोहीत भारतीय, भाजप आमदार प्रसाद लाड, युवा सेनेचे सिद्धेश कदम आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. राजकीय नेते, उमेदवार आणि नागरिकांना जोडणारा हे व्यासपीठ आहे. तेथे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतानाच लोकशाहीबद्दलच्या आपल्या कर्तव्याबाबतही आपण जागृत होणार आहात. ही वेबसाईट म्हणजे मतदान करू इच्छिणार्‍यांसाठी सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा अल्लाउद्दीनचा खजिनाच असणार आहे.

तनिषा अवर्सेकर यांच्या संकल्पनेतून ही वेबसाईट तयार झाली आहे. लंडनमधील किंग्स कॉलेजमधून तनिषा यांनी इंग्लिश, पॉलिटीक्समध्ये पदवी घेतली आहे. राज्यकर्ते आणि प्रजा यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यातील संवादाने परस्परांना शिक्षित करण्याची संकल्पना या वेबसाईटमागे आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून मतदाराला आपल्या उमेदवाराला प्रश्नही विचारता येणार आहेत.

- Advertisement -

मला एक असे व्यासपीठ तयार करायचे होते की, तेथे राजकीय नेत्यांना मतदार, आपल्याला काय हव आहे, हे थेट विचारतील. तसेच राजकीय नेत्यांनी काय केले, विशेषत: अपक्ष तरुण नवउमेदवारांना त्यांची माहिती, त्यांनी केलेली कामे मतदारांपर्यंत पोहचवता येतील.
– तनिषा अवर्सेकर, मुख्य संपादिका आणि सीईओ, लोकतंत्र

आम्ही सुरुवातीला लोकतंत्र हे मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासाठी सुरू करत आहोत. मात्र आगामी विधान सभा निवडणुकीपूर्वी राज्यभरात ही सेवा लागू करण्याचा आमचा मानस आहे.
– सुर्यदीप मल्होत्रा, मार्केटिंग प्रमुख, लोकतंत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -