Video: अरे बापरे! कोरोना लस टोचताच त्याची बदलली भाषा

A person suddenly started speaking in another language after getting Corona vaccine video viral on social media
Video: अरे बापरे! कोरोना लस टोचताच त्याची बदलली भाषा

कोरोना व्हायरसवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरणाची मोहीम युद्धपातळी सुरू झाली आहे. काही लसीचे दुष्परिणाम समोर आले आहेत. पण आता एक आश्चर्यचकीत करणारे कोरोना लसीचा (Corona Vaccine) परिणाम समोर आला आहे. चक्क कोरोना लस टोचताच एका व्यक्तीची भाषा बदलली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बिजनेसमॅन हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हर्ष गोयंका यांनी ट्विटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एकाबाजूला इंजेक्शन दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीचा फोटो दिसत आहे. व्हिडिओमधील या व्यक्तीचा आवाज ऐकू येत आहे. ज्यामध्ये तो कोरोना लसीचा अनुभव गमतीशीर पद्धतीने सांगत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चिनी लसीचा परिणाम.’

व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पाहू शकता की, तो व्यक्ती सांगतोय, कोरोना लस टोचल्यानंतर तात्काळ मला कोणतेच साईड इफेक्ट झाले नाही, परंतु हळूहळू. एवढेच बोलताच त्या व्यक्तीचा आवाज बदलतो आणि त्याचा चेहराही बदलतो. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरील लोकांना खूप आवडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून खूप साऱ्या प्रतिक्रियांचा पाऊल पडत आहे. एका युझरने या व्हिडिओला कॅमेंट केली आहे की, ‘दुसरी भाषा शिकण्याची सर्वात सोपी पद्धत.’ तर दुसऱ्या युझरने कॅमेंट केली की, ‘यापेक्षा कायमस्वरुपी मास्क लावलेला बरा.’


हेही वाचा – कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक आहे ‘बुरशी’ रोग; वैज्ञानिकांनीही व्यक्त केली भिती