घरमुंबईआरे कॉलनीतील वाहतूक 24 तासांसाठी बंद, झाडे तोडली जात असल्याचा पर्यावरणप्रेमींना संशय

आरे कॉलनीतील वाहतूक 24 तासांसाठी बंद, झाडे तोडली जात असल्याचा पर्यावरणप्रेमींना संशय

Subscribe

मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाक्याला जोडणारा आरे कॉलनी मधला मुख्य मार्ग पोलिसांनी बंद केला आहे. गोरेगाव चेक नाक्यावर आज सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी 24 तासांसाठी बंद असणार आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात असल्याचे कारण मुंबई वाहतूक पोलिसांनी दिले आहे. मात्र, आरे मेट्रो कारशेडच्या कामासाठी झाडे तोडली जात असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हा मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची गैरसोय झाली आहे. मार्ग बंद असल्यामुळे पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गांवरून जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आरे कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आरे कॉलनीतील मार्ग वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.

आरेमधील रस्ता अचानकपणे बंद करण्यात आल्याने मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आले आहे. आरे कॉलनीतील रस्त्याच्या लगत असलेल्या वृक्षांची तोड केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

पर्यावरण प्रेमींना पोलिंसांची नोटीस –

मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर पर्यावरणप्रेमींकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.

झाडे कापली जाण्याची शक्यता –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरे परिसरातील कारशेडच्या कामावरील बंदी उठवल्यानंतर या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. आरे परिसरात सोमवारी पुन्हा एकदा मेट्रो कारशेडच्या कामाला प्रारंभ झाला. यानंतर पोलीस संरक्षणात याठिकाणी झाडे कापली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरुन पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेतील मेट्रो प्रकल्पासाठी नव्याने झाडे कापावी लागणार नाहीत, असे म्हटले होते. मात्र, जर झाडे कापली गेली तर शिंदे-फडणवीस सरकारला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -