घरमुंबईTRP Scam : BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांना अटक, आज...

TRP Scam : BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांना अटक, आज कोर्टात सुनावणी

Subscribe

टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून दासगुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे. आज शुक्रवारी त्यांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी बीएआरसीचे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांनाही अटक केली आहे. टेलिव्हिजन ऑडियन्स मॉनिटर करणाऱ्या बीएसआरसीच्या टीमपैकीपार्थ यांची ही दुसरी अटक आहे.

टीआरपी घोटाळ्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी, रोमिल रामगढिया यांच्या अटके पाठोपाठच आता बीएआरसीचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना करण्यात आलेली अटक महत्वपूर्ण मानली जातेय. बार्क (BARC) म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही टीव्ही चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था आहे. या संस्थेनेच सुचवल्यावरुन मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरु केला होता. त्या बार्क संस्थेच्या माजी कार्यकारी प्रमुखाला म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला याआधीच अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. त्यामध्ये प्रामुख्याने तीन वाहिन्यांवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी हंसा रिसर्च या संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. हंसा रिसर्चच्या दोन कर्मचाऱ्यांसोबतच फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या मराठी चॅनेलच्या मालकांनाही अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -