घरमुंबईहरित क्षेत्र विकास योजनेचा बोजवारा

हरित क्षेत्र विकास योजनेचा बोजवारा

Subscribe

केंद्र सरकारच्या हरित क्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून दोन कोटी रुपये खर्चून मीरा-भाईंदर महापालिकेने झाडे लावली. पण, झाडांना नियमित पाणी, त्यांची निगा राखली न गेल्याने अनेक झाडे सुकून गेली असून योजनेचाच बोजवारा उडाला आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेकडील आरक्षण क्रमांक 196, 230, 256, 261, 273 आणि 335 या आरक्षणावर एकूण दोन कोटी रुपये खर्च करून विविध प्रकारची एकूण 22 हजार 406 झाडे लावण्यात आली आहेत. मीरारोडमधील रामदेव पार्क परिसरातील आरक्षण क्रमांक 230 हा भूखंड हरित क्षेत्र विकास प्रकल्प योजने करता सन 2017-18 मध्ये आरक्षित करुन त्याठिकाणी अमृत वन योजना राबवण्यात आली.

- Advertisement -

पण, गेल्या कित्येक महिन्यापासून झाडांना पाणी न दिल्याने अनेक झाडे सुकून गेली आहेत. झाडांचे संगोपन व्यवस्थितरित्या न केल्यामुळे झाडे सुकून तूटू लागली आहेत. काही झाडे तर वाकून खाली पडली आहेत. लावण्यात आलेल्या निम्म्याहून अधिक झाडांच्या फांद्यांना तर एकही पान राहिलेले नाही. महापालिकेने हरित विकास नाव जरी दिले असले तरी त्या जागेवर झाडांचा कोणत्याही प्रकारचा हरित विकास झालेला दिसून येत नाही.

झाडांच्या बाबतीत महापालिका नेहमी दुर्लक्ष करत आल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी झाडांवर लाइट लावणे, खीळे ठोकून जाहिरातबाजी करणे आदी प्रकार चालत आहेत. उद्यान विभागाचे याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने झाडांची अवस्था खराब होत आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून अनेक ठिकाणी चौपट्या, दुभाजक, रस्ते, उद्यान सुशोभिकरण करण्यात येत आहे. झाडांची छाटनी, साफसफाई, योग्य ती निगा राखणे, औषध फवारणी याकरता विभागातर्फे कामगारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पण, झाडांची दुर्दशा बघून वृक्ष विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

- Advertisement -

झाडांची दुर्दशा झालेली आम्ही खपवून घेणार नाही. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण (उद्यान ) विभागाने झाडांची होणारी दुर्दशा थांबवावी. झाडांवरील विळखा लवकर हटवावा. झाडे जगवण्यासाठी योग्य ते उपाय करावेत.
— नीलेश शाहु, पर्यावरणप्रेमी

यासंंबंधी माहिती हवी असल्यास लेखी पत्र द्या. सर्व माहिती दिली जाईल.
— हंसराज मेश्राम, उद्यान अधीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -