घरमुंबईदिवा रेल्वे फाटकावर एक्स्प्रेसखाली दोन बाईकस्वारांचा मृत्यू

दिवा रेल्वे फाटकावर एक्स्प्रेसखाली दोन बाईकस्वारांचा मृत्यू

Subscribe

ठाण्यातील दिवा रेल्वे फाटक क्रॉस करत असताना एक्स्प्रेसखाली येऊन दोन बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवा रेल्वे फाटक क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना एक्सप्रेसने या दोन बाईकस्वार तरूणांना उडवलं

ठाण्यातील दिवा रेल्वे फाटक क्रॉस करत असताना एक्स्प्रेसखाली येऊन दोन बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवा रेल्वे फाटक क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना एक्सप्रेसने या दोन बाईकस्वार तरूणांना उडवलं. हे दोन्ही तरूण दिवा गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

एक्स्प्रेसच्या धडकेने जागीच मृत्यू

सकाळी अकराच्या सुमारास हे दोन्ही तरूण अॅक्टिव्हावरून दिवा रेल्वे फाटकाजवळ आले. त्याच दरम्यान एक्स्प्रेस जाणार असल्यामुळे फाटकाजवळ अनेक जण थांबले होते. मात्र या दोन्ही तरूणांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. समोरून एक्स्प्रेस येत असल्याचे दिसत असूनही हे दोन्ही तरूण बाईक घेऊन पुढे गेले. मात्र, एक्स्प्रेसने रेल्वे रूळ क्रॉसिंगवर या दोन्ही बाईकस्वारांना धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

जनजागृती करूनही तरूणांचे साहस

रेल्वे रूळ ओलांडू नये याकरिता सतत जनजागृती करत असतानाही बरेच तरूण अशा प्रकारचे धाडस करून आपला जीव गमावत असणाऱ्या घटना सतत समोर येत आहेत. या जनजागृतीचा कोणताही परिणाम न होता लोक आपला जीव रेल्वेखाली गमावत असल्याचं परत एकदा समोर आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -