घरCORONA UPDATECoronaVirus - धारावीत कोरोनाचे दोन बळी, कोरोनाग्रस्तांची संख्या १३ वर!

CoronaVirus – धारावीत कोरोनाचे दोन बळी, कोरोनाग्रस्तांची संख्या १३ वर!

Subscribe

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून येताच महापालिका अधिकाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती. परंतु आता या झोपडपट्टीत रुग्णांची संख्या वाढत जाताना दिसत असून बुधवारी आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. तर बुधवारी आणखी एकाचा केईएम रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृताचा आकडाही दोनवर पोहोचला आहे.

धारावी डॉ. बलिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर पाठोपाठ धारावी क्रॉस रोडवरील जनता नगर येथे दोन तर मुस्लिम नगर येथे एक अशाप्रकारे ३ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मुस्लिम नगर येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला केईएम रुग्णालयातील एमआयसीयूमधील स्वच्छता कर्मचारी आहे. त्यामुळे या महिलेच्या अगदी जवळच्या संपर्कातील ४ जणांना राजीव गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

तर जनता सोसायटीतील ५९ वर्षीय पुरुषाला व ४९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहेत. याशिवाय काल धनवाडा चाळीतही ३५ वर्षी पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु ही व्यक्ती वडाळा येथील हॉटेलमध्ये राहणार आहे. यापूर्वी डॉ. बलिगा नगर येथील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी सोशल नगर  येथील ६४ वर्षीय पुरुषाचा केईएम रुग्णालयात निधन झाले आहे. त्यामुळे धारावीतील आतापर्यंतची रुग्णांची एकूण संख्या १३ वर पोहोचली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

 १७ दिवसांमध्ये ३०हजार अन्न पाकीटांचे वाटप

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर २३ मार्चपासूनत ते ८ एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्यावतीने गरीब व गरजू तथा निराधार नागरिक तसेच कुटुंबासाठी एकूण ३० हजार २५० अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. शिवाय ५ व्यक्ती गृहीत धरुन एका कुटुंबासाठी आठवड्याचे रेशनही उपलब्ध करून दिले आहे. अशाप्रकारे जीवनावश्यक वस्तूंच्या ९ हजार पाकिटांचे वाटप संपूर्ण धारावी परिसरात  करण्यात आल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. या मदत कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व खासगी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी आभार मानले आहेत.

- Advertisement -

दहा बाधित क्षेत्रांमध्ये पुरवण्यात आलेली मदत

एकूण बाधित क्षेत्रांची संख्या : १०

भाजीपाल्याचा पुरवठा :  १२२० किलो

किराणा मालाचा पुरवठा : ५८ पाकिटे

औषधांचा पुरवठा : २० हजार रुपये

धारावीतील कोणत्या भागांमध्ये आहेत रुग्ण

डॉ.बलिगा नगर : ४(१ मृत, ३ रुग्णालयात दाखल)

वैभव अपार्टमेंट : १ (३५ वर्षीय डॉक्टर)

मुकुंद नगर : २ (४९ व २५ वर्षीय पुरुष)

मदिना नगर : १ (२१ वर्षीय पुरुष)

धनवाडा चाळ :१ ( ३५ वर्षीय पुरुष-वडाळ्यातील हॉटेलमध्ये राहणारा)

मुस्लिम नगर : १ (५० वर्षीय महिला)

सोशल नगर : १ (१ मृत)

जनता सोसायटी :२ (५९ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय महिला)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -