घरताज्या घडामोडीनाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात 5 पॉझिटिव्ह 

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात 5 पॉझिटिव्ह 

Subscribe

मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील 51 वर्षीय कोरोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यासह सहाजणांचे घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, अहवाल येण्याआधीच एकाचा बुधवारी (दि.8)  मृत्यू झाला. रात्री उशिरा मालेगावातील सहाजणांचे रिपोर्ट रुग्णालयास मिळाले आहेत. त्यातील पाचजण पॉझिटिव्ह असून मृत व्यक्तीचा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे.

नाशिकमध्ये कोरोनाबाधित व संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. पाच मालेगांव, नाशिक शहर व लासलगावामधील प्रत्येकी एक आहे. मालेगावातील मृत व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी हज यात्रेला जावून आला होता. त्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावातील चार पॉझिटिव्ह रुग्णांवर सामान्य रुग्णालय मालेगाव येथील कोरोना विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.पाचही रुग्ण वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. कोणीही परदेशात जावूूून आले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मालेगावातील १८ पैकी ६ जणांचे अहवाल प्राप्त. १२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

- Advertisement -

मालेगावात एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून हा कोरोनाचा उद्रेक आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीय, नातलगांचा मालेगाव आरोग्य पथकांमार्फत शोध घेतला जात आहे. त्या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.

डॉ. सुरेश जगदाळे जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -