घरमुंबईशेण तुम्ही खाल्लेत, आम्हाला काय विचारता?

शेण तुम्ही खाल्लेत, आम्हाला काय विचारता?

Subscribe

आघाडीच्या जाहिरातींवर उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

दहा वर्षात झालेले सर्व घोटाळे काढा आणि मग आम्हाला विचारा लाज वाटते का ? लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही. कारण, आम्ही शिवाजी महाराजांचे मर्द मावळे आहोत,असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेसच्या ‘लाज वाटते का?’ या होर्डींगचा समाचार घेतला.तुमचे सर्व घोटाळे लोकांच्या अजुनही लक्षात आहेत. तुमचा आदर्श घोटाळा, कोळसा घोटाळा, शेण घोटाळा आदी घोटाळे लोक विसलेले नाहीत. काय खायचे सोडले होते म्हणून तुम्ही आयपीएल मध्ये सुद्धा घोटाळा केलात,अशा शब्दांत उध्दव ठाकरेंनी पवारांवर थेट हल्ला चढवला.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गजानन किर्तीकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची गोरेगावामध्ये सभा पार पडली. या प्रचार सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना लक्ष्य केले. किमान मनोहर पर्रिकर यांच्यासारख्या मृत पावलेल्या व्यक्तीला तरी राजकारणा ओढू नका,असे सुनावले. शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्यावर ती परकीय असल्याचा आरोप केला होता. तो पवारांना पंतप्रधान व्हायचे होते म्हणून हे राजकारण ते खेळले होते,अशीही टीका केली.

- Advertisement -

सुशील कुमार शिंदे हे भस्म लावून घेताना मी फोटो पाहिला. ते भस्म तुम्ही साठवून ठेवा, सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसवाले, कारण निवडणुकीनंतर तुम्हाला भस्म घेऊनच जावे लागेल,असे सांगितले. यावेळी त्यांनी आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांचाही समाचार घेताना ते म्हणाले, समोरच्या उमेदवाराबद्दल बोलण्याची त्यांची लायकीच नाही. काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आणि मिलिंद देवरा यांना केले, त्यांच्याबद्दल काय बोलावे,असाही सवाल त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -