घरताज्या घडामोडीठाण्यातील इमारती अनधिकृत, मग मतं कशी अधिकृत? मुख्यमंत्र्यांचा सवाल

ठाण्यातील इमारती अनधिकृत, मग मतं कशी अधिकृत? मुख्यमंत्र्यांचा सवाल

Subscribe

ठाण्यातील इमारती अनधिकृत आहेत. मग मतं अधिकृत कशी? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील स्मारक उभे राहायला अजून वेळ असला तरी, बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा मान ठाणे नगरीने मिळविला’, असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, गुरुवारी ठाण्यात दिली. ठाण्यातील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर देखील तोफ डागली. ते म्हणाले, ‘ठाण्यातील इमारती अनधिकृत आहेत. मग मतं अधिकृत कशी?’, असा सवाल उपस्थित केला. तसेच ‘आम्ही सत्तेत असो किंवा नसो, पण दिलेला शब्द आपण पाळतो’, असा टोला विरोधकांना लगावला.

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेल्या तीन हात नाका येथील स्मारकाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज ठाण्यात पार पडला. सदर स्मारकात बाळासाहेबांच्या दुर्मिळ चित्रांचा समावेश असून बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेसाठी ती एक पर्वणीच ठरणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ठाणे दौरा असून या दौऱ्यात अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘सत्तेत असो वा नसो पण आपण जे वचन देतो ते पाळतोच’, अशा शब्दात त्यांनी सत्तेतील पूर्वीच्या सहकाऱ्यांना टोला लगावला. ‘राजकारणी म्हणून आपण जनतेकडून हक्काने मते मागतो. मग त्याच जनतेला हक्काचे घर देणे आपले परमकर्तव्य’, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘ठाण्यातील इमारती अनधिकृत असल्याचा कांगावा करण्यात येतो. मग ही मते अधिकृत कशी?’, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.


हेही वाचा – ‘आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे’; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -