घरमुंबई...आणि अध्यक्ष महोदय म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला टोला

…आणि अध्यक्ष महोदय म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला टोला

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडून नाना पटोले यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सभागृहात सर्वात अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांची अभिनंदन केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आणि सभागृहात एकच हशा पिकला. सभागृहात बोलताना ‘आपल्याला सभागृहाचा अनुभव नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय हा शब्द बोलावा लागतो का?’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडून नाना पटोले यांचे कौतुक

दरम्यान, ‘सभागृहात बोलताना उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. नाना पटोले शेतकऱ्यांचे नेते आहेत. भाजपसोबत असतानाही त्यांनी त्यांचा आक्रमक बाणा कायम ठेवला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमधून ते बाहेर पडले. त्यांचा स्वभाव अतिशय बंडखोर आहे. कोणाचीही भीडभाड न बाळगता ते त्यांची मते व्यक्त करतात’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -