उदयनराजे भोसले कृष्णकुंजवर, बंद दाराआड चर्चा

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर गेले आहेत. या भेटीचे कारण गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून या दोन्ही दिग्गजांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे.

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर गेले आहेत. या भेटीचे कारण गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून या दोन्ही दिग्गजांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याआधीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता ते थेट मराठी भाषा दिनी राज यांच्या भेटीला गेल्याने या दोघांमध्ये नक्की काय चाललयं यावर चर्चा रंगल्या आहेत.