घरमुंबईअभ्यासक्रम कपातीनंतर घटक चाचणीबाबत संभ्रम

अभ्यासक्रम कपातीनंतर घटक चाचणीबाबत संभ्रम

Subscribe

शिक्षण विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटक चाचणी परीक्षा कशी व किती गुणांची घ्यायची याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. घटक चाचणीबाबत पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम असून, याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केल्यानंतर आता शिक्षण विभागाने घटक चाचणीबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होऊ लागली आहे.

ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर काही शाळांना ऑनलाईन घटक चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु शिक्षण विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटक चाचणी परीक्षा कशी व किती गुणांची घ्यायची याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मूल्यांकनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे घटक चाचणीबाबत पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम असून, याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू झाल्या नसल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यानुसार ऑनलाईन वर्ग सध्या सुरू आहेत. शाळा उशीराने सुरू झाल्याने शिक्षक संघटनेकडून सीबीएसईप्रमाणे अभ्यासक्रम कपात करण्याची मागणी सरकारने विलंबाने मान्य केली. मात्र आता अनेक शाळांना ऑनलाईन घटक चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. ऑनलाईन शिक्षण अद्यापही सर्वांपर्यंत पोहोचत नाही. ऑनलाईन शिक्षण अद्यापही मुलांना समजत नसल्याने ऑनलाईन चाचणी नको असा सूर पालक व शिक्षकांमधून उमटत आहे.

शाळेत प्रथम व द्वितीय सत्रात प्रत्येकी एक घटक चाचणी घेतली जाते. ही परीक्षा लेखी असल्याने ती सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटक चाचणी परीक्षा व सत्र परीक्षा कशी व किती गुणांची घ्यायची, मूल्यांकन पद्धत कशी असेल याबाबत शिक्षण विभागाने तातडीने स्पष्टता आणावी.

-राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट

ऑनलाईन शिक्षण सर्वत्र पोहचत नाही. त्यामुळे ऑनलाईन चाचणी नको अशीच मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतीत तातडीने निर्णय घेण्यात यावा.

– शिवनाथ दराडे, कार्यवाह, शिक्षक परिषद 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -