घरमुंबईरंगीला गर्लने घेतली पवारांची भेट

रंगीला गर्लने घेतली पवारांची भेट

Subscribe

बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या दोघांमध्ये चर्चा झाली आहे.

बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर अनेकांच्या भेटीगाठी करत आहेत. नुकतीच उर्मिलाने शरद पवार यांच्या निवास्थानी भेट घेतली आहे. दरम्यान, दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे. तसेच लोकसभा निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मातोंडकर आणि शेट्टी यांच्यात होणार लढत

उत्तर मुंबई हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून याठिकाणी भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचा विजय पक्का मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा कोणीही उमेदवार याठिकाणी निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार नसतानाही उर्मिला मातोंडकर या शेट्टींना टक्कर देण्यास तयार झाल्या आहेत. मातोंडकर यांच्या उमेदवारीने या भागातील काँग्रेसमध्ये तसेच जनतेमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मातोंडकर या शेट्टींना काँटे की टक्कर देणार हे निश्चित आहेत. त्यामुळे यामध्ये साडेपाच लाखांचे मताधिक्य कमी करून त्यांनी विजय मिळवून जाईंट किलर बनल्या तर कौतुक ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -