घरमुंबईट्रोल झाले तरी मी रडणार नाही- उर्मिला मातोंडकर

ट्रोल झाले तरी मी रडणार नाही- उर्मिला मातोंडकर

Subscribe

संजय निरूपम यांनी आयोजित केलेल्या युवा संमेलनात पहिल्यांदाच मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि बॉलिवूडमधील रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकर आणि गुजरातचे पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी उपस्थित राहिले होते. त्यावेळी उर्मिला मातोंडकर म्हणाली ट्रोल झाले तरी, खचणार नाही आणि रडणारही नाही.

लोकसभा निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या जोरदार प्रचारस स्थानिक तर राज्यस्तरयी पक्षांकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान दि. ७ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाकडून युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि बॉलिवूडमधील रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकर आणि गुजरातचे पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी उपस्थित राहिले होते. या दोघांनिही काहि दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईमधून उमेदवरी देण्यात आली आहे. युवा संमेलनात उर्मिला मातोंडकर हिने वक्तव्य केले की, खूप दिवसांपासून ट्रोल केले जात आहे. मात्र, या गोष्टींमुळे खचणार नाही आणि रडणार नाही, असे म्हटले आहे.

अभिनेत्री आहे म्हणून ट्रोल

अंधेरीमध्ये युवा संमेलन काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यातर्फे उत्तर पश्चिम मुंबईत राहणाऱ्या सर्व युवकांकरिता आयोजित करण्यात आले होते. यावेळी संजय निरूपम म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिले युवाकांना भेटने आवश्यक होते. त्यामुळेच हा युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले होते. संजय निरूपम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान उर्मिला म्हणाली की, काही गोष्टींसाठी काही दिवसांपासून माला ट्रोल केले जात आहे. मात्र, मी या पदाचा उपयोग रडण्यासाठी करणार नाही आहे, असे उर्मिला हिने म्हटले आहे. त्यानंतर उर्मिला म्हणाली की, बॉलिवू़डमध्ये काम केल्याचा मला गर्व आहे. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री असल्यामुळे मला ट्रोल केले जात आहे. ते असे समजतात की, मी अभिनेत्री आहे म्हणजे माझ्याकडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची क्षमता नाही आहे. तसेच युवा संमेलना दरम्यान, उर्मिलाने मोदी सरकारवर ही जोरदार टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -