घरट्रेंडिंगजॉय राईडसाठी पोलिसांनी पळवली कार, मालकाने केली गाडी लॉक

जॉय राईडसाठी पोलिसांनी पळवली कार, मालकाने केली गाडी लॉक

Subscribe

आपल्याच जाळ्यात अडकुन पडल्याची उदाहरणे, घटना आपण एकल्या किंवा वाचल्या आहेत. पण पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिस अडकल्याची एक अतिशय विचित्र घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पोलिस हे स्वतःच एका गाडीत तब्बल तीन तास अडकून पडल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखमीपूर खेरी जिल्ह्यातील नई बस्ती गावात ही घटना आहे. उत्तर प्रदेशातील शहरी भागापासून ही गाडी १४३ किलोमीटर लांब ही गाडी गेली होती. त्या गाडीमध्ये एक पोलिस उपनिरीक्षक, दोन हवालदार अडकून पडले होते.

दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर लखनऊच्या गोमतीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एक एसयुवी कार जप्त केली. या प्रकरणात जप्त केलेली कार घेऊन निघाले. तब्बल १४३ किलोमीटर लखनऊपासून लांब गेल्यानंतर पोलिसांसमोरचे संकट आणखी वाढू लागले. कारण गाडीच्या मालकाला आपली कार ही नियमित अंतरापेक्षा दूरवर गेल्याचे आढळले. आपली कार ट्रॅक करण्यासाठी त्याने वापरलेल्या जीपीएस ट्रॅकिंगच्या पर्यायामुळे त्याला कार ही लखनऊपासून बऱ्याच अंतरावर गेली असल्याचे आढळले. म्हणूनच त्याने तत्काळ ती कार लॉक केली. कार लॉक झाल्यानंतर पोलिसांनी अनेकदा बाहेर पडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण काही केल्या त्यांना कारमधून बाहेर पडता येत नाही असे लक्षात आले. कार लॉक केल्यानंतर गाडीचे इंजिनच सुरू होत नसल्याने कार मालकांना आणखीनच घाम फुटला. कारमध्ये असलेल्या मायक्रो कंट्रोलरमुळे कारमधून बाहेरही पडता येत नाही आणि इंजिनही स्टार्ट होत नाही. मायक्रो कंट्रोलरला पासवर्ड मिळाल्यानंतरच ही कार सुरू होऊ शकते. त्यामुळे या गाडीच्या मालकाने पासवर्डने कार अनलॉक केल्यानंतरच तब्बल ३ तासांनंतर या पोलिसांची सुटका होऊ शकतली. या घटनेनंतर कारमालकाने आता पोलिसांविरोधतच कारच्या दुरूपयोगाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कार ही सुरक्षित हातात नाही असे सांगत पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. आता या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत लखनऊ पोलिसांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -