घरCORONA UPDATEVaccination: ...तर तीन आठवड्यात मुंबईचे लसीकरण, आदित्य ठाकरेंना विश्वास

Vaccination: …तर तीन आठवड्यात मुंबईचे लसीकरण, आदित्य ठाकरेंना विश्वास

Subscribe

मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याचे प्रयत्न

मुंबईत लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने इतर देशांकडून करोना प्रतिबंधित लसींची खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याची सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत. हे जर शक्य झाले तर केवळ तीनच आठवड्यात संपूर्ण मुंबईचे लसीकरण करण्याचे नियोजन तयार असल्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना वरील माहिती दिली. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधित अँपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अँप हाताळू शकत नाहीत,अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर आम्ही काम करत आहोत.

मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

सहकारी गृहनिर्माण संस्था आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही आज महापालिकेने जारी केल्या आहेत, राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

दरम्यान, मुंबईचे लसीकरण तीन आठवड्यात करण्याचे नियोजन तयार असल्याच्या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राचा भाग आहे. त्यात लसीकरणाचा वेगळा विषय होणार नाही. राज्याच्या लसीकरणाबाबत योग्य तो निर्णय होईल.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईचा रिकव्हरी रेट ९२ टक्के,तर १ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -