घरमुंबईमहालक्ष्मीमधील विठ्ठल निवास इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल

महालक्ष्मीमधील विठ्ठल निवास इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल

Subscribe

मुंबईतील आगीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. आज मुंबईच्या महालक्ष्मीमधील विठ्ठल निवास इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि ३ पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. लेव्हल 2 च्या या आगीने संपूर्ण  मजला आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. आग इतकी भीषण आहे की, परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर लवकरचं घटनास्थळी दाखल होणार आहे. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कोणतीही दुखापत झाली नाही अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. 

- Advertisement -

ही इमारत अगदी रस्त्याच्या लगत असल्याने या ठिकाणी मोठी रहदरी असते. मात्र या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर रिकामी करण्यात आला आहे. तसेच इमारतीच्या खालीच्या बाजूस मोठ्याप्रमाणात दुकानं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


नोटबंदी, 258 किलो सोने आणि श्रीधर पाटणकर; नेमका घोटाळा काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -