घरताज्या घडामोडीIncome Tax Raids: हिरो मोटोकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाल यांच्या घरावर आयटीचा छापा

Income Tax Raids: हिरो मोटोकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाल यांच्या घरावर आयटीचा छापा

Subscribe

हिरो मोटोकॉर्प कंपनीचे (Hero MotoCorp Chairman) चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल (Pawan Munjal) यांच्या परिसरात इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax) छापा टाकला आहे. माहितीनुसार, पवन मुंजाल यांच्या घरात आणि गुडगाव येथील ऑफिसमध्ये सकाळपासून इन्कम टॅक्स विभाग छाननी करत आहे.

- Advertisement -

इन्कम टॅक्स विभागाला हा संशय

पवन मुंजाल यांनी आपल्या खात्यात बोगस खर्च दाखवल्याचा आरोप केला आहे. तसेच टॅक्स चोरी केल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात इन्कम टॅक्स विभागाने आज सकाळी पवन मुंजाल यासंबंधित ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. माहितीनुसार आयटी पथकाला जे संशयास्पद खर्च आढळले आहेत, त्यामध्ये काही इनहाऊस कंपन्या आहेत. अजूनही आयटीची ही छापेमारी सुरू आहे. पवन मुंजाल यांचे घर आणि ऑफिस व्यतिरिक्त कंपनीच्या काही इतर मोठ्या अधिकाऱ्यांसंबधित परिसरातसुद्धा आयटीची छापेमारी सुरू आहे. पण अजूनपर्यंत या छापेमारीबाबत ना हिरो मोटोकॉर्पने आणि ना आयटी विभागाने अधिकृत माहिती दिली नाहीये.

कंपनीच्या शेअर्समध्ये गडगडात

हिरो मोटोकॉर्पसंबंधित आयटीच्या छापेमारीची बातमी समोर येताच कंपनीचे शेअर गडगडले आहेत. आज सकाळी १०.२० वाजेपर्यंत हिरो मोटोकॉर्प शेअर जवळपास २ टक्क्यांपर्यंत घसरले होते.

- Advertisement -

३६ ठिकाणी छापेमारी

माहितीनुसार इन्कम टॅक्स विभागाने एअर चार्टर एविएशन सर्व्हिसेज प्रायव्हेट लिमिटेड आणि हिरो कार्प ग्रुपवर छापेमारी केली आहे. जवळपास कंपनीसंबंधित ३६ ठिकाणी छापेमारी होत आहे. दिल्ली, नोयडा, गुडगाव, गाझियाबाद, पंजाबमध्ये छापेमारी होत आहे. हिरो कार्प ही मुंजाल ब्रदर्सची असून एअर चार्टर मनिंदर सिंह सेठीची कंपनी आहे.


हेही वाचा – तीन शहरांमध्ये आयटीच्या धाडी, हिरानंदानी ग्रुपची २४ ठिकाणं टार्गेटवर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -