घरमुंबईमतदान करा - उपचारावर २० टक्के सवलत घ्या!

मतदान करा – उपचारावर २० टक्के सवलत घ्या!

Subscribe

बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची मोफत रक्त चाचणी, उच्च रक्तदाब, ईसीजी आणि अन्य शारीरिक चाचण्या मोफत करून दिल्या जातील.

मुंबई महानगर आणि मोठ्या शहरांतील मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असून मतदार जागृती आणि मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स ठेवलेल्या असून त्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. खारघर ते पनवेल विभागात आरोग्यक्षेत्राला महत्वाचे योगदान देणाऱ्या खारघरच्या निरामया हॉस्पिटलतर्फे ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान वैद्यकीय उपचारांवर मतदान केलेल्या नागरिकांना २० टक्के सवलत मिळणार आहे. ओपीडी सेवा तसेच आंतर रुग्णालयात दाखल केल्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांवर ही सवलत उपलब्ध असणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना निरामया हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित थडानी यांनी सांगितलं की, “देशामध्ये कोणत्याही ठिकाणी मतदान केलेल्या नागरिकाला ही सवलत लागू असून मतदाराचा सन्मान करण्यासाठीच आम्ही ही योजना राबवली आहे. मतदान प्रक्रिया वाढवणे ही देशभक्ती आहे. मतदारांनी केलेल्या मतांचा यानिमित्ताने गौरवच केला जाणार आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावायलाच हवा.”

अॅपेक्सकडून मोफत उपचार

मुंबईतील अॅपेक्स हॉस्पिटलतर्फे मतदान केलेल्या मतदारांसाठी मोफत बाह्यरुग्ण सेवा आणि आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आलं. त्यानुसार २९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत मोफत वैद्यकीय सेवा मतदाराला मिळणार आहे. बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची मोफत रक्त चाचणी, उच्च रक्तदाब, ईसीजी आणि अन्य शारीरिक चाचण्या मोफत करून दिल्या जातील. याशिवाय कर्करोग, बालरोगतज्ज्ञ, हाडांचे विकार, स्त्रीरोग समस्या यासंदर्भात विशेष सल्ला देखील मोफत दिला जाईल. या शिबीरात भाग घेण्यासाठी ९३२०५६७००९ या क्रमांकावर नाव नोंदवणं गरजेचं असून शिबीरात येताना जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणणं अनिर्वाय असेल.

याविषयी अधिक माहिती देताना अॅपेक्स हॉस्पिटल समूहाचे संचालक डॉ. व्रजेश शहा यांनी सांगितलं की, ‘‘ देशात निवडणुकी दरम्यान काळात मतदानाचा टक्का खूपच कमी असतो. लोक मतदानासाठी घराबाहेरच पडत नाहीत. पण, योग्य सरकार निवडून देण्यासाठी प्रत्येकाचं मत आवश्यक आहे. यासाठी शाळा आणि महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही हॉस्पिटलतर्फे रुग्णांना मोफत बाह्यरुग्ण सेवा देण्याचा निर्णय घेतला. यात २९ एप्रिल ते ५ मे दरम्यान मतदान केलेल्या मतदारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणारे. फक्त, या तपासणीसाठी मतदानाची सविस्तर माहिती आणि हाताच्या बोटाची शाई असणं बंधनकारक आहे.’’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -