घरमुंबईकल्याणातील तलाव दुरवस्थेच्या गाळात 

कल्याणातील तलाव दुरवस्थेच्या गाळात 

Subscribe

पालिका प्रशासनाची उदासीनता 

ठाण्यापाठोपाठ कल्याण  हे तलावाचे शहर म्हणून ओळखले जात होते, पण आता शहरीकरणात अनेक तलाव हे नामशेष झाले आहेत. जे तलाव शिल्लक आहेत, त्यांचेही संवर्धन केले जात नाही. त्यामुळे बहुतांशी तलाव कोरडे पडले असून, अनेक तलावात शेवाळ गाळ कचरा यांनी भरलेले आहेत. महापालिकेने आतापर्यंत अवघे दोनच तलावांचे सुशोभाकरण  केले आहे. त्यामुळे जलसंवर्धनाकडं पालिका प्रशासन आणि सत्ताधार्‍यांची  उदासीनताच दिसून येत आहे. त्यामुळे कल्याणातील अनेक तलाव दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहेत.महापालिका हद्दीत एकूण 42 तलाव आहेत. कल्याणातील काळा (भगवा) तलाव आणि टिटवाळ्यातील महागणपती मंदिर तलावाचे पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर तलावांना अवकळा आली आहे.
पालिकेच्या  पर्यावरण अहवालातून हे उजेडात आले आहे. तलाव, सरोवर आणि जलाशय ही स्थानिकांची अत्यावश्यक गरज भागवण्याबरोबरच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी  महत्त्वाची कामगिरी बजावतात. मात्र, जलसंवर्धनाकडे ंपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गौरीपाडा तलावातील गाळ काढण्यात आला असून, साफ करण्याचे काम सुरू आहे. उंबर्डे तलावात 20 टक्के तर सापाडा गावाबाहेरील तलावात 40 टक्के पाणी असून, त्याचा वापर स्थानिक रहिवासी करीत आहेत. अनेक तलावात आजही पाणी आहे.
भटाळे तलावात शेजारील सांडपाणी जात आहे. मात्र, त्यावर पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही त्यामुळे तलावाचे पाणी दूषित होत आहे.  बल्याणी,  टिटवाळा या परिसरातील तलावात गाळ असल्याने साफ करणे गरजेचे आहे, तसेच गौरीपाडा तलाव, उंबर्डे तलाव, डावजे, राहटले तलाव, आधारवाडी जेलजवळील तलाव, पोखरण तलावातील गाळ पालिकेकडून काढण्यात आला आहे . चिंचपाडा, एफ केबीन जवळील तलाव आणि जरीमरी देवी तलावात शेवाळ साचली आहेत. उंबर्डे तलाव, गौरीपाडा, रहाटाळे, सापाड, आधारवाडी, भटाळे, चोळे (डोंबिवली) तलावांचे सुशोभीकरण पालिकेने केले, पण केवळ संरक्षण कठडे आणि गाळ काढण्यापुरतीच मर्यादीत राहिले.  तलावांच्या सुशोभीकरणासाठी दरवर्षी पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येते. मात्र, हा निधी खर्च केला जात नसल्याने सुशोभीकरण केवळ कागदावरच राहिले आहे. तलावात निर्माल्य प्लास्टिक पिशव्या आणि कचरा टाकला जात असल्याने अनेक तलाव प्रदूषित झाले आहेत.  त्यामुळे तलाव वाचविण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे.
या तलावात पाणीच नाही 
अटाळी, आंबिवली गाव, सापाड गाव, चक्की नाका,  सोनारपाडा, घेसर तलाव,  विजयनगर तलाव या तलावांमध्ये पाणी नाही. त्यामुळे हे तलाव कोरडे पडले आहेत.
या तलावात गाळ
बल्याणी गाव तलाव,   मांडा पूर्व तलाव , उंबर्डे तलाव, सापाड गावाबाहेरील तलाव, भटाळे तलाव, दावजे तलाव आधारवाडी जेल तलाव नांदिवली तलाव पिसवली तलाव चिंचपाडा तलाव मानपाडा तलाव घेसर तलाव निळजे तलाव काटई तलाव उसरघरतलाव भोईरवाडी तलाव चोळेतलाव आयरे तलाव विजयनगर तलाव केापरगाव गावदेवी मंदिरजवळील तलाव आदी तलावात गाळ असून, साफ करणे गरजेचे आहे.
कुठे किती तलाव 
प्रभाग क्षेत्र —- तलावांची संख्या
अ प्रभाग ———- 8
ब प्रभाग———–  4
क प्रभाग——- —6
ड प्रभाग ———–4
ड ग्रामीण ———-4
ई प्रभाग ———-11
फ प्रभाग ———-2
ग प्रभाग ———-2
ह प्रभाग ———–1
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -