घरमुंबईमुंबईला ३७७ दिवस पुरेल एवढा तलावांमध्ये पाणीसाठा

मुंबईला ३७७ दिवस पुरेल एवढा तलावांमध्ये पाणीसाठा

Subscribe

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमधील पाणी साठ्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असून सध्या या सर्व तलावांमधील पाण्याचा साठा ९९.०५ टक्के एवढा झाला आहे. १ ऑक्टोबरपर्यंत जमा होणार्‍या पाणी साठ्यावर वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे १ ऑक्टोबरपर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या या तलावांमध्ये १४ लाख ३३ हजार ६७७ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला असून पुढील ३७७ दिवस पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये उपलब्ध आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलावांमध्ये मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ३३ हजार ६७७ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईला वर्षभरासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा अपेक्षित असतो. त्या तुलनेत हा पाणी ९९.०५ टक्के एवढा जमा झाला आहे. सन २०१८ व सन २०१७ मध्ये १ ऑक्टोबरला अनुक्रमे ९१.०५ टक्के आणि ९९.१३ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला होता.

- Advertisement -

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याच्या साठ्यात ८ टक्क्यांनी वाढ होत ९९.०५ टक्के एवढा पाणी साठा जमा झाल्याने पाणीकपातीची समस्या सुटली आहे. पुढील १२ ऑक्टोबर २०२०पर्यंत पुरेल इतका पाणी साठा असेल. मागील वर्षी कमी पाणी साठा जमा झाल्याने महापालिकेने दहा टक्के पाणीकपात दिवाळीनंतर लागू केले होती. ही कपात यावर्षी जुलै महिन्यात मागे घेण्यात आली होती. जुलै महिन्यात ही कपात मागे घेतल्यानंतर महापालिकेवर जोरदार टीका झाली होती. परंतु, यंदा पाऊस मोठ्याप्रमाणात पडल्याने तलावांमधील साठा वाढवून मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारची पाण्ीाकपात करण्याचा विचार नसल्याचे जल अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -