घरताज्या घडामोडी'मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, पण तो भाजपचा'

‘मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, पण तो भाजपचा’

Subscribe

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. आज भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे. कोरोना काळात विरोध करायचा नाही म्हणून आम्ही सरकारला साथ दिली. सरकार मात्र रोज उठून केंद्रावर टीका करायचे. आता मात्र आम्ही राज्य सरकारला सोडणार नाही. त्यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका फडणवीस यांनी केली.

“राजाचा जीव पोपटामध्ये आणि काही लोकांचा जीव महानगरपालिकेत आहे. भ्रष्टाचाराचे आगार असलेली महापालिकेतील सत्ता २०२२ मध्ये बदलून टाकू. २०१७ साली देखील आम्ही सत्ता उलथवली असती. मात्र दोस्ती निभावण्याच्या नादात आम्ही सत्ता देऊन टाकली”, असे सांगत २०२२ साली सत्ता काबीज करण्यासाठी फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. प्रत्येक वॉर्डात निवडणूक न लढविणारा एक नेता देण्यास मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना देण्यास सांगितले आहे. तसेच भाजप युवा मोर्चा, महिला मोर्चा यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ‘मॅन टू मॅन आणि होम टू होम’ मिशन राबवून महानगरपालिका काबीज करायची असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

सत्ता हस्तगत केल्यानंतर यांच्या डोक्यात हवा गेली आहे, अशी टीका शिवसेनेचे नाव न घेता फडणवीस यांनी केली.  सरकारला एक वर्ष पुर्ण होण्याच्या आत त्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. ही मस्ती महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपल्याला मोडावी लागेल, अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -