घरमुंबईपश्चिम उपनगराला पावसाने झोडपले, पहा कुठे सर्वाधिक पाऊस

पश्चिम उपनगराला पावसाने झोडपले, पहा कुठे सर्वाधिक पाऊस

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कुठे किती पाऊस झाला याबाबतची आकडेवारी प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबामार्फत जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा बीकेसीत झाला आहे. त्यापाठोपाठ धारावीत सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या मध्यवर्ती भागातच वाहतूकीची प्रचंड कोडी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची सर्वाधिक नोंद झाल्याचे पहायला मिळाले.

पश्चिम उपनगराला पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे. मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद ही बीकेसीत म्हणजे ३६६.४ मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ धारावीत ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथे २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मालाडला २५७.२ मिमी पाऊस तर बोरिवलीत २०४.४ मिमी पाऊस गेल्या २४ तासात पडला. दक्षिण मुंबईत कुलाबा येथे १४७ मिमी पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरात भांडूप येथे १८५ मिमी आणि चेंबूर येथे २०९ मिमी पावसाची नोंद झाली.

- Advertisement -

Rain

आज दिवसभरात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मुंबईत ताशी ४५ किमी ते ५५ किमी या वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे काही भागात पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम लोकल ट्रेन आणि बस सेवेवर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पावसासाठी यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. पुढच्या २४ तासांसाठी मात्र काही भागात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -