घरक्रीडाविकास कृष्णन भारतीय संघात

विकास कृष्णन भारतीय संघात

Subscribe

ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी बॉक्सिंग

अनुभवी बॉक्सर विकास कृष्णनने (६९ किलो) निवड चाचणीची अंतिम लढत जिंकत फेब्रुवारीमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याच्यासह अन्य दोन जणांनी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.

जागतिक स्पर्धा आणि एशियाडमधील सुवर्णपदक विजेत्या विकासने निवड चाचणीतील ६९ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत दुर्योधन सिंग नेगीवर मात केली. त्याचप्रमाणे राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्या गौरव सोलंकी (५७ किलो) आणि नमन तन्वर (९१ किलो) यांनीही आपापले सामने जिंकत ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले. ५७ किलो वजनी गटात सोलंकीने मोहम्मद हुसामुद्दीनचा, तर ९१ किलो वजनी गटात तन्वरने नवीन कुमारचा पराभव केला. ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धा ३ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत वुहान (चीन) येथे होणार आहे.

- Advertisement -

रविवारी आशियाई रौप्यपदक विजेता आशिष कुमार (७५ किलो), अनुभवी सतीश कुमार (+९१ किलो) आणि सचिन कुमार (८१ किलो) यांनी निवड चाचणी जिंकत भारतीय संघात स्थान मिळवले. तसेच जागतिक स्पर्धेत पदक जिंकून अमित पांघल (५२ किलो) आणि मनीष कौशिक (६३ किलो) यांनी याआधीच भारतीय संघात स्थान निश्चित केले होते.

भारतीय संघ –
अमित पांघल (५२ किलो), गौरव सोलंकी (५७ किलो), मनीष कौशिक (६३ किलो), विकास कृष्णन (६९ किलो), आशिष कुमार (७५ किलो), सचिन कुमार (८१ किलो), नमन तन्वर (९१ किलो), सतीश कुमार (+९१ किलो)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -