घरमुंबईप्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि मुलीची हत्या

प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि मुलीची हत्या

Subscribe

प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि अडीज वर्षांच्या चिमुरडीची हत्या करून दोन्ही मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या पतीला त्याच्या २२ वर्षीय प्रेयसीसह शाहू नगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे.मायलेकीची हत्या केल्यानंतर मृतदेह जाळून हा अपघात असल्याचा बनाव या दोघांनी रचला होता अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तेहसिन सय्यद आणि अडीज वर्षाची आलीया या मायलेकीचा मृतदेह गुरुवारी सकाळी शाहू नगर पोलिसांना धारावीतील जस्मिन मिल रोड परिसरात असलेल्या डायमंड अपार्टमेंट या इमारतीच्या १०व्या मजल्यावरील रूम नं १०१० मध्ये आढळून आला होता. दोघांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली होती व दोन्ही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आले होते. शाहू नगर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पूर्वतपासणीसाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय या ठिकाणी पाठवले होते. या हत्यांच्या संशयावरून पोलिसांनी तेहरिनचा पती इलियास (३८) याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. इलियास हा पत्नी तेहसिन आणि दोन मुलीसह डायमंड अपार्टमेंट येथे राहण्यास होता. इलियास याचा वडाळा येथे जरीचा कारखाना आहे. गुरुवारी सकाळी मोठ्या मुलीच्या शाळेत वार्षिक संमेलन असल्यामुळे ती सकाळीच शाळेत गेली होती. घरात तेहरिन, अडीज वर्षाची मुलगी आलिया आणि इलियास हे तिघेच होते.

- Advertisement -

काही वेळाने इलियास देखील कारखान्यावर निघून गेला होता. त्याच इमारतीत राहणार्‍या एका नातेवाईकाने इलियासला घरात झालेल्या प्रकारची माहिती फोनवर दिली त्यानंतर तो घरी आला अशी माहिती त्याने पोलिसांना प्राथमिक चौकशीत दिली. मात्र इलियास खोट बोलत असल्याचे पोलिसाच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने रात्री उशिरा गुन्ह्याची कबुली देत हे कृत्य त्याने आपली प्रेयसी आफरिनबानो हिच्या मदतीने केले असल्याचे पोलिसांना सांगितले. आफरिनबानो ही मृत तेहसिन हिची दूरची चुलत बहीण असून ती वडाळा परिसरात राहण्यास आहे. तिचे आणि इलियसचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.

अपघात झाल्याचा बनाव रचला

- Advertisement -

इलियासच्या घरी आलेली प्रेयसी आफरिनबानो हिने तेहसिन मृत झाल्याची खात्री करून तेहसिनच्या मोबाईल फोन वर ‘हम हमेशा के लिये जा रहे है, आय लव्ह यु जानू ’ असा मेसेज टाईप करून तो मेसेज इलियासच्या मोबाईल फोनवर पाठवला. त्यानंतर आफरिनबानो हिने घरातील खाद्यतेल आणि रॉकेलचा वापर करून दोन्ही मृत्यूदेह पेटवून तेथून पळ काढला. घरात आग लागली आणि आगीत या दोघींचे मृत्यू झाला असा बनाव रचण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -