घरताज्या घडामोडीमुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली होणार ? मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत केली ही घोषणा

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली होणार ? मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत केली ही घोषणा

Subscribe

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी महत्त्वाची चर्चा करण्यात आली आहे.

मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या काळात अत्याश्यक सेवेतील अधिकाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली.त्यानंतर महिलांसाठी लोकल सुरु करण्यात आली. मात्र सर्व सामान्यासाठी लोकल कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. लवकरात लवकर मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली जात होती. लोकल सर्वसामान्या लोकांसाठी पूर्ववत सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे.

बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड,  बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह,  यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईतही चेन्नई पॅर्टन राबवता येईल का याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. महिलांना ज्याप्रमाणे गर्दीची वेळ टाळून लोकल सेवा सुरु करण्यात आली त्याचप्रमाणे सर्व सामान्या लोकांसाठी अशीच काही वेळ असणार आहे का याकडे सर्व सामान्यांचे लक्ष लागून आहे.


हेही वाचा – राज्यपाल दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पूर्वकल्पना, राजभवनाचे स्पष्टीकरण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -