घरमुंबईलग्नाचे आमिष दाखवत शिक्षिकेवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवत शिक्षिकेवर बलात्कार

Subscribe

लग्नाचे आमिष दाखवत एका शिक्षिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने पीडित मुलीचा दोनवेळा गर्भपात केला.

लग्नाचे आमिष दाखवून एका २८ तरुणाने २५ वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याची घटना विले पार्ले येथे समोर आली आहे. मागील पाच वर्षे हा तरुण महिलेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप मुलीने केला आहे. पीडित मुलगी ही शिक्षिका आहे. मागील काही वर्षांपासून या मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. मात्र त्याने या मुलीशी फक्त शारीरिक संबध ठेवले. आरोपी मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे विलेपार्ले पोलिसांनी सांगितले. २०१४ पासून या दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मुलीकडून लग्नाची मागणी केली जात होती मात्र मुलाने तिला अनेक वर्षे तात्काळत ठेवले होते.

फेसबुकवर झाली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१२ मध्ये आरोपी मुलगा आणि पीडित मुलीची फेसबुकवरून ओळख झाली होती. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर यासंबधाचे रुपांतर प्रेमात झाले. मागील अनेक वर्षांपासून पीडित मुलगी आरोपी तरुणाकडे लग्नकरण्याची मागणी करत होती. मात्र आई वडिलांना सांगतो म्हणून त्याने अनेकदा या मुलीला टाळले. मात्र मुलीने जोर दिल्यानंतर त्याने पीडित मुलीशी साखरपूडा केला होता. मात्र हा साखरपूडा अनौपचारीक पद्धतीचा होता. साखरपूड्याला फक्त या मुलाचे मित्र होते. २०१५ आणि २०१७ मध्ये दोनदा ही मुलगी गरोदर होती. मात्र दोन्ही वेळा या मुलाने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले होते. फेब्रुवारी महिन्यात अखेर या मुलीने आरोपीच्या पालकांना गाठले मात्र पालकांनी या मुलीला शिवीगाळ केली होती. यानंतर या मुलीने पोलिसांकडे याची तक्रार केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -