घरमनोरंजनVideo : आईला ओळखण्यासाठी फक्त तिच्या एका स्पर्शाची गरज असते, पहा वायरल...

Video : आईला ओळखण्यासाठी फक्त तिच्या एका स्पर्शाची गरज असते, पहा वायरल व्हिडिओ

Subscribe

या व्हिडिओमध्ये एक लहान मुल समोर बसलेल्या महिलांमधील त्याच्या आईला शोधून काठतो. समोर बसलेल्या महिलांनी एकाचं रंगाची साडी नेसली आहे आणि तोंडावर पदर घेतला आहे. त्यामुळे त्या लहानग्याचा चांगलाचं गोंधळ उडालेला आहे.

आई आणि मुलांच्या नात्यामध्ये एक अनोखी जादू असते. जगातलं सर्वात सुंदर नातं हे आई आणि मुलांचं असतं.या नात्यामध्ये कुठलाचं स्वार्थ नसतो. असाचं एका निर्मळ नात्याचा प्रत्यय दाखणनारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतून समजतंय की, मुलाला त्याच्या आईला ओळखण्यासाठी आईचा चेहरा बघण्याची गरज लागत नाही. आईच्या फक्त एका स्पर्शाने देखील मुल त्याच्या आईला ओळखू शकतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा तुमच्या लहानपणीचे असेच किस्से आठवतील, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये एक लहान मुल दिसत आहे, त्याच्या समोर पिवळ्या रंगाची साडी नेसून काही महिला बसल्या आहेत. त्यात त्यांनी तोंडावर पदर देखील घेतला आहे. त्यामुळे त्या सगळ्या एक सारख्याचं दिसत आहेत. आता यामधून त्या लहान मुलाला त्याच्या आईला ओळखायचे आहे, तो काही क्षणासाठी गोंधळलेला दिसून येतोय. त्याच्या समोर बसलेल्या महिला त्याला लल्ला…लल्ला…अशी हाक सुद्धा मारताना दिसून येत आहेत. त्यामुळे तो अजूनचं कोड्यात पडत आहे. इतक्यात एक महिला त्याला उचलून घेते. पण त्याला जाणवतं की, ती त्याची आई नाही. तो पुन्हा त्याच्या आईला ओळखण्याचा प्रयत्न करू लागतो.

- Advertisement -

45 सेकेंडच्या या व्हिडिओमध्ये त्या चार महिलांपैकी त्याच्या आईला तिच्या स्पर्शाने ओळखतो, त्याची आई त्याला तिच्या मांडीवर बसवते, तेव्हा तो आईच्या कुशीत हसत-हसत बसतो. यावरूनचं दिसून येते की, कुठल्याही लहान मुलाला त्याची आई ओळखण्यासाठी फक्त तिचा स्पर्श देखील पुरेसा आहे.


हेही वाचा : अक्षय कुमारने ‘बेवफा’ म्हणत कपिल शर्माला मारली मिठी, जुन्या भांडणानंतर दोघे पुन्हा एकत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -