घरमुंबईवॉटर व्हेडिंग मशीनवर काम करणारे कामगार ४ महिने पगारापासून वंचित

वॉटर व्हेडिंग मशीनवर काम करणारे कामगार ४ महिने पगारापासून वंचित

Subscribe

गेल्या चार महिन्यांपासून वॉटर व्हेडिंग मशीनवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे घर चालविणे कठीण झाल्याने कर्मचार्‍यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. कर्मचार्‍यांची समस्या लक्षात घेता आणि वॉटर व्हेडिंग मशीन तोट्यात असल्यामुळे कंत्राटदारांनी पाणी विका आणि पैसे घेऊन जा, अशी मुभा कर्मचार्‍यांना दिली आहे. त्यामुळे दररोज वॉटर व्हेडिंग मशीनचे कर्मचारी पाणी विकून संसाराचा गाडा हाकत आहेत.

इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅन्ड टूरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांनी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर एकूण 83 वॉटर व्हेडिंग मशीन बसविल्या आहेत. या वॉटर व्हेडिंग मशीन चालविण्याकरिता खासगी कंत्राटदराची नेमणूक करण्यात आली होेती. त्यांनी या मशिन्सवर कर्मचार्‍यांची नियुक्त केली आहे. प्रत्येक कर्मचार्‍यांना 11 हजार रुपये महिन्याचे वेतन मिळत होते. सुरुवातीला वेळेवर पगार मिळत होता. मात्र त्यानंतर ७ तारखेला होणारा पगार १३ ते १४ तारखेला मिळू लागला. हळूहळू दोन महिन्यांनी एका महिन्याचा पगार मिळत होता. मात्र आता मागील चार महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला, तसेच कर्मचार्‍यांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता.

- Advertisement -

तेव्हा या वॉटर व्हेडिंग मशीन चालविणार्‍या कंपनीने कर्मचार्‍यांचा समस्या लक्षात घेतल्या. कर्मचार्‍यांना दिलासा म्हणून दिवसाला जेवढे पाणी वॉटर व्हेडिंग मशीनर विकले जाते. तेवढे पैसे कर्मचार्‍यांना स्वत:कडे ठेवण्याची मुभा कंत्राटदारांनी दिली. त्यामुळे काही जणांना थोडासा तरी दिलासा मिळाला; मात्र काही कर्मचार्‍यांनी सागितले की, मध्य रेल्वेच्या काही रेल्वे स्थानकावरच वॉटर व्हेडिंग मशीन व्यवसाय चांगला होतो. बाकी रेल्वे स्थानकावर दिवसाला 200 रुपये पाण्याची विक्री होते. त्यामुळे हे यामागे उपाय नाही. कंपनीने लवकरात लवकर आमचे थकीत वेतन द्यावे. अन्यथा कंपनी विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागणार आहे.

कंपनी तोट्यात
आयआरसीटीसीने वॉटर व्हेडिंग मशीनची जबाबदारी एका खासगी कंपनीला देण्यात आली आहे. कारण यातून पाण्याची विक्री फार कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे वॉटर व्हेडिंग मशीनचे पाण्याचे बिल, ईलेक्ट्रीक बिल आणि कर्मचार्‍यांचे वेतन देणे कठीणे होते. कंपनीला काही सवलत दिली असती तर आज कर्मचार्‍यांचे वेतन थकविण्याची वेळ आली नसती.

- Advertisement -

सर्व कर्मचार्‍यांना त्यांचे थकीत वेतन देण्यात येणार आहे. त्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. कर्मचार्‍यांना अडचण येऊ नये, म्हणून रोजच्या वॉटर व्हेडिंग मशीनवरुन होत असलेल्या पाणी विक्रीचे पैसे घेवून जा, अशी मुभा कर्मचार्‍यांना दिली आहे. त्यानंतर त्याचा हिशेब करुन त्यांचे उर्वरित थकीत वेतन देण्यात येणार आहे.
– पियुष्य पुष्कर, समन्वयक, आर्च संस्था

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -