घरताज्या घडामोडीवरळी सिलेंडर दुर्घटनेतील बाळाच्या वडिलांचाही मृत्यू, मुंबई पालिकेत चाललंय काय? आशिष शेलारांचा...

वरळी सिलेंडर दुर्घटनेतील बाळाच्या वडिलांचाही मृत्यू, मुंबई पालिकेत चाललंय काय? आशिष शेलारांचा सवाल

Subscribe

मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास महापौर कुठे निजल्या होता?

वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जात असेल आणि तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास महापौर कुठे निजल्या होता? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल अशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. मुंबई पालिकेचा मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे म्हणत आशिष शेलार यांनी मुंबई पालिका आणि सर्व अधिकाऱ्यांवर टीका केली.

सिलेंडर स्फोटाच्या घटनेनंतर महापौरच ७२ तासांनी पोहचल्या तर तिथल्या स्थानिक आमदारांकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात. आमचे आमदर युवराज त्यांचे विमान सतत हवेतच असतं त्यांना खाली उतरायला अजिबात वेळ नाही,अशी टीका आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

- Advertisement -

नायर रुग्णालयातील हा प्रकार टाळक फिरवणारा असल्याचे म्हणत आशिष शेलारांनी रुग्णालयातील परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, घटनेनंतर नायर रुग्णालयात पोहचलेल्या जखमी रुग्णांना जवळपास ४५ मिनिटे तसेच ठेवले होते. त्यांच्यावर कोणतेही उपचार किंवा त्यांची विचारपूस केली गेली नाही. रुग्णालयाच्या याच हलगर्जीपणामुळे चार महिन्याचा बाळाचा मृत्यू झाला आणि त्याच्यामागे त्याच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. या सगळा प्रकार टाळक फिरवणारा आहे.

आशिष शेलार यांनी पुढे असे म्हटले की, घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुंबईच्या महापौर किंवा पालिकेतील एकही अधिकारी किंवा स्थायी समितीतील अधिकारी त्या ठिकाणी पोहचला नाही. मात्र त्यांच्या आधी भाजप नेत्यांचा गट तिथे पोहचला आणि त्यामुळे मुंबई पालिकेच्या रुग्णालयात सुरू असलेला हा हलगर्जीपणा सर्वांसमोर आला. तसेच नायर रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पा देखील बिनकामी असल्याची टीका आशिष शेलारांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – ST workers strike : मेस्मा लावण्याऐवजी कर्मचाऱ्यांशी चर्चा करा – देवेंद्र फडणवीस

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -