घरमुंबईयाकूब मेमनची कबर सजवण्यासाठी टागर मेमनने दिली धमकी?

याकूब मेमनची कबर सजवण्यासाठी टागर मेमनने दिली धमकी?

Subscribe

याकूब मेमन कबर सजावट प्रकरण प्रचंड तापल आहे. या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. याकूब मेमन प्रकरणावर राज्य सरकारने चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्याची धमकी ही बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी टायगर मेमनच्या नावाने दिली असल्याचे समोर आले आहे. बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबधीत असलेल्या एका व्यक्तीने ही माहीती पोलिसांना दिली आहे.

 

- Advertisement -

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यासाठी धमकी ?

मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, मुंबईतील बडा कब्रस्तान येथील काही जागा मेमन कुटुंबीयांच्या नावाने करण्यासाठी तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या मागे मेमन कुटुंबीयांशी संबधित असलेला व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या मोहम्मद मेमन यांनी केला होता. मात्र हे काम माझ्या अंतर्गत येत नसल्याने मी करु शकत नाही अशी प्रतिक्रिया तक्रारदाराने दिली. मात्र यानंतर तक्रारदार व्यक्तीला फोन आणि मॅसेज करून ही मागणी वारंवार करण्यात येत होती मात्र त्यांच्या मागणीला न जुमानता तक्रारदाराने अखेरपर्यंत नकार दिला. मात्र यानंतर मोहम्मद मेमन यांनी धमकी देण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

दरम्यान, याकूब भाई आता शहीद झाला आहे मात्र, टायगर भाई अद्याप जिवंत आहे. “तुम्ही बडा कब्रस्तानमध्ये जागा दिली नाही तर टायगर भाईशी बोलून तुम्हाला ठिकाणी लावू. टायगर भाई काय आहे हे तुम्हाला माहित नसेल. ते अजूनही कोणाच्या हाती आलेले नाहीत पण तुम्हाला गायब करतील” अशी धमकी तक्रारदाराला देण्यात आल्याची माहिती समोर येतेय

मात्र या धमकीनंतरही तक्रारदार घाबरला नाही ‘आम्ही कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करणार नाही’ असे त्याने रोखठोकपणे सांगितले. मात्र यानंतर टायगर मेमनचा नातेवाईक असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने बदनामी करतत ट्रस्टमध्ये तक्रारदार विरोधात कंम्प्लेट केली. दरम्यान टायगर मेमनच्या नावाने धमकी दिल्याने आमच्या जिवाला धोका असल्याचे तक्रारदाराने म्हंटले आहे.

नेमकं प्रकरण काय ? का होतेय याकूब मेमनच्या कबिरीची चर्चा?

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आली तसचे त्याभोवती लाईटींग आणि कठडा देखील उभारण्यात आला. यामुळे राज्यभरासह देशभरामध्ये संतापाची तीव्र लाट उमटत आहे.

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -