घरमुंबईFailure to Repay : अनिल अंबानी यांना धक्का; रिलायन्सचे मुख्यालय बँक घेणार...

Failure to Repay : अनिल अंबानी यांना धक्का; रिलायन्सचे मुख्यालय बँक घेणार ताब्यात

Subscribe

रिलायन्स (ADAG) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात खासगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेने कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रातील बँक (yes bank) येस बँकेने अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज येथील मुख्यालय ताब्यात घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या अन्य दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर सर्व बँकांचे १२ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.

येस बँकेकडून सांगण्यात आले आहे की, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला बँकेने २ हजार ८९२ कोटी रूपयांचे कर्ज दिले होते. ही प्रक्रिया त्या कर्जाच्या रकमेच्या परतफेडीसाठी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बँकेने रिलायन्सची नागिन महल येथील दोन कार्यालयेही ताब्यात घेतली आहेत. डिफॉल्टर्सचे असेट्स आपल्या ताब्यात घेत त्याची विक्री करण्याचा अधिकार बँकांना आहे. सध्या येस बँकेवर मोठ्या प्रमाणात बॅड लोन असल्यामुळे ते संकटात आहे. ते कमी करण्यासाठी येस बँक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावरही बँकांचे १२ हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. कारवाई करण्यापूर्वी बँकेने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाला ६० दिवसांती नोटीस बजावली होती. ५ मे रोजी याची मुदत पूर्ण झाली असून परंतु कंपनीकडून कर्जाची रक्कम भरण्यात आली नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

चिंताजनक! कोरोनाला हरवलेल्या ८०% रूग्णांना हृदयविकाराचा धोका – New Research

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -