घरमहाराष्ट्रलिंगपरिवर्तन करुन बनायचे होते 'बार डान्सर'

लिंगपरिवर्तन करुन बनायचे होते ‘बार डान्सर’

Subscribe

नागपूर मधील एका अल्पवयीन तरुणाला 'बार डान्सर' होण्यासाठी त्यांनी लिंगपरिवर्तन करण्याचा विचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेसाठी या मुलांनी घरातील ५० तोळे सोन चोरल्याची माहिती समोर आली आहे.

लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करुन एका अल्पवयीन मुलाला ‘बार डान्सर’ बनण्याची इच्छा असलेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करण्यासाठी या अल्पवयीन मुलाने घरातील तब्बल ५० तोळे सोनं चोरल्याची घटना नागपूर येथे घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली असून संबंधित मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

का बनायचे होते ‘बार डान्सर’

नागपूर पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवनीय मुलाची आई त्याला सोडून गेली होती. त्यानंतर हा मुलगा आपल्या मामा-मामी सोबत नागपुरात राहत होता. तर या मुलाची मामी मुंबईत बार डान्सर होती. तो नेहमी आपल्या मामीकडे पैसा पाहायचा. तर आपली मामी पैशाच्या जिवावर मौजमजा करत असल्याचे ते देखील त्यांनी पाहिले होते. हा मुलगा आपल्या मामीच्या जीवनशैलीकडे आकर्षित झाला होता. मामीला मिळणारे पैसे, तिची मौजमजा या आकर्षणामुळे या मुलांने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करुन बार डान्सर होण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

काय होता मुलाचा प्लॅन?

लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करुन मुंबईत जायचे. मुंबईत बार डान्सर होऊन रग्गड पैसे कमवण्याची या मुलाची इच्छा होती. मात्र पैसे नसल्याने या मुलाने घरातलेच सोन्याचे दागिने चोरण्याचा विचार केला. या मुलाच्या मामीने मुंबईतून ३० तोळे सोने खरेदी केले होते. त्यातील २० तोळे सोने तिच्या मैत्रिणीचे होते. तिच्या मैत्रिणीने दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी मुलाच्या मामीकडे दिले होते. तर मामी आणि तिची मैत्रिण दागिने ठेवण्यासाठी लॉकरच्या शोधात होत्या. दरम्यान या मुलाला आपल्या घरात ५० तोळे सोनं असल्याची कुणकुण लागली. त्याने हे सोनं लंपास करण्याचा विचार करुन ७ ऑगस्टला सोनं लंपास करुन पसार झाला.

त्यानंतर आला मुंबईत

हा पसार झालेला मुलगा रिहान धनावत, इम्रान शरीफ, फरुख शेख, प्रशांत जंगडे यांना तो भेटला. या चार मुलांनी त्याच्याकडून सोनं घेऊन त्याची मुंबईत एका भाड्याच्या घरात राहण्याची व्यवस्था केली. त्यासोबत हे सोनं विकून किंवा गहाण टाकून तुझ्या शस्त्रक्रियेचा खर्च भागवू असं देखील सांगितले. दरम्यानं संबंधित मुलाच्या मित्राने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात करुन या अल्पवयीन तरुणाला १७ सप्टेंबर रोजी ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

- Advertisement -

अल्पवयीन मुलाचे म्हणणे काय?

पोलिसांनी या मुलाची चौकशी केली असता हा मुलगा समलैंगिक असल्याचे उघडकी आले आहे. या मुलाची चौकशी केल्यानंतर मला लिंगपरिवर्तन करुन बार डान्सर बनायचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरकणी पोलीस अधिक तपास करीत असून या मुलाची तत्काळ बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -