घरमुंबईरविवारी भरते रस्त्यावर शाळा

रविवारी भरते रस्त्यावर शाळा

Subscribe

उपक्रमाअंतर्गत गरजू मुलांना दिले जातात मोफत शिक्षण आणि जेवण

झगमगणाऱ्या महानगरांमध्ये चकाकी बरोबरच एकीकडे अंधारमय गरिबी दिसून येते. मुंबईतील रस्त्यांवर आपला संसार करणारे नागरिक उदरनिर्वाहासाठी अनेकदा आपल्या लहानमुलांसह भिक मागताना दिसतात. या लहान मुलांना दोन वेळ जेवणाची भ्रांत नसते. गरिबांसाठी सरकारने केलेल्या योजनांचा लाभ सर्वाच गरिबांना होत नसल्याने बरीचशी मुल शिक्षण घेत नाहीत. या कारणामुळे देशातील गरिबीचा टप्पा वाढत आहे. अशा मुलांना शिकवण्याचा वसा काही तरुणांनी घेतला आहे. विशेश म्हणजे हे तरुण कामावर जाऊन रविवारच्या दिवशी रस्त्यावरील मुलांना रस्त्यावरच शिकवतात. दर रवीवारी रस्त्यावर या मुलांची शाळा भरत असून त्यांना या शाळेत जेवणही पुरवले जाते. अंधारम जिवन असलेल्या या मुलांच्या जीवनात आठवड्यातील एक दिवस हे तरुण ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात.

Educating and Empowering Street Kids
मुलांना शिकवणी देतांना तरुण मुले

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण शॉपिंग, पिकनीक किंवा मुंबईबाहेर फिरण्याचे बेत आखतात. आठवड्यातील पाच दिवस काम केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी मजा करण्यासाठी विकेंडचे बेत आखण्यात येतात. याच रविवारी काही तरुण मुंबईतील रस्त्यांवरील लहान मुलांना शिकवतात. पैसे नसल्यामुळे ही मुले रस्त्यावर भीक मागतात किंवा काही वस्तू विकून आपल्या कुटुंबीयांना पैसे मिळवून देतात. ‘पैसे मिळवून देणारी मशीन’ असा या मुलांचा वापर घरच्यांकडून केला जातो. त्यांच्या शिक्षणाबाबत आई-वडिल उदासिन असतात. शिकल्यामुळे मुलगा भिक मागणार नाही असे काहींना वाटते. यासाठी अनेकजण आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत. मुलांनी पैसे मिळवून आणला की त्याचे व्यसन करुन त्यांनाच मारहाण करतात. अशा मुलांना मदत म्हणून त्यांना रस्त्यावरच मोफत शिक्षण दिले जाते. शाळेत शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना शाळेत दाखल केल्या जाते. मुलांना दहावी पर्यंत शिक्षण दिले जाते. रॉबिनहूड आर्मी असे या संस्थेचे नाव असून मुंबई व्यतिरीक्त अन्य शहरांमध्ये ही संस्था कार्यरत आहे.

- Advertisement -
Educating and Empowering Street Kids
या शाळेत मुलांच्या चहेऱ्यावर उमटले आनंदाचे भाव

बँककर्मचारी नतालिया दलाल (२५) ही मागील दिड वर्षांपासून या संस्थेत कार्यत आहे. एका खाजगी बँकेत काम करुन नतालिया रविवारी या मुलांना शिकवते. शहरात ती वरळी विभागात राहत असून सुट्टीच्या दिवशी एनजीओसाठी काम करते. या बद्दल अधिक माहिती देतांना नतालियाने सांगितले की, “व्यसनाच्या आहारी गेलेले पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत. ही मुलेच देशाचे भविष्य आहेत. यामुलांना स्वःताचे बरे वाईट कळत नसल्याने त्यांना शाळेत मिळणारे प्राथमिक शिक्षण आम्ही देतो. मुंबईतील विविध भागात मुलांना शिक्षण दिले जाते. माझे सहकारी विविध क्षेत्रात काम करत असून सुट्टीच्या दिवशी आम्ही एका ठिकाणी जमून मुलांना शिक्षण व जेवण पुरवतो. वरळी विभागात १३ मुलांना आम्ही शिकवतो तर सिफेसकडे १५ मुले आहेत. शिक्षण घेतलेल्या मुलांची माहिती संस्थेकडून संभाळून ठेवली जाते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -