घरनवी मुंबईसिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ४,१५८ घरे विक्रीकरिता उपलब्ध

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ४,१५८ घरे विक्रीकरिता उपलब्ध

Subscribe

या महागृहनिर्माण योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळून सुमारे १६,००० अर्ज प्राप्त झाले. महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास ३ ऑक्टोबर २०२२ ही अंतिम तारीख होती. परंतु, अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणीस ०३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला होता. यामुळे सुमारे ४ हजारांहून अधिक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे शक्य झाले.

नवी मुंबई: सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना ऑगस्ट – २०२२ करीता संगणकीय सोडत दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सिडको भवन येथील सिडको सभागृहामध्ये पार पडली. सिडकोतर्फे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येऊन नवी मुंबईच्या विविध नोडमधील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध ४,१५८ घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, महागृहनिर्माण योजना ऑगस्ट – २०२२ मध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांचे डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी अभिनंदन केले. तसेच अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांनी निराश न होता सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ करीता अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सदर संगणकीय सोडत प्रक्रियेवर देखरेख करण्याकरिता सिडकोतर्फे श्री. सुरेश कुमार, माजी लोकायुक्त यांच्या पर्यवेक्षणाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. मोईझ हुसेन हेही या समितीतील एक सदस्य होते. सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ४,१५८ घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. परवडणार्‍या दरातील या ४,१५८ घरांपैकी ४०४ घरे (उत्पन्न मर्यादा – ० ते ३ लाख) ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित ३,७५४ घरे (उत्पन्न मर्यादा -३ लाखांपेक्षा अधिक) ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती.
या महागृहनिर्माण योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळून सुमारे १६,००० अर्ज प्राप्त झाले. महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास ३ ऑक्टोबर २०२२ ही अंतिम तारीख होती. परंतु, अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणीस ०३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला होता. यामुळे सुमारे ४ हजारांहून अधिक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे शक्य झाले.

पारदर्शक प्रक्रियेद्वारे सर्व अर्जदारांना समान संधी
सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) ही पूर्णत: मानवी हस्तक्षेपविरहित आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक विभागाकडून या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे काढण्यात येणार्‍या सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांमधील निवडक प्रतिनिधींना पंच म्हणून सहभागी करून घेतले जाते. तसेच सोडती दरम्यान पात्र अर्जदारांच्या आणि सदनिकांच्या यादीची यादृच्छिक (Random) पद्धतीने सरमिसळ करण्यात येते. अत्यंत पारदर्शक व निष्पक्ष अशा या प्रक्रियेद्वारे सर्व अर्जदारांना समान संधी सुनिश्चित करण्यात येते.

- Advertisement -

हक्काचे घर घेण्याची संधी
महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ अंतर्गत वेगाने विकसित होत असलेल्या उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व २ए, खारकोपर पूर्व २बी आणि खारकोपर पूर्व पी३ येथे ७,८४९ सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गृहनिर्माण योजनेद्वारे रेल्वे, महामार्ग, एमटीएचएल यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उलवे नोडमध्ये हक्काचे घर घेण्याची संधी नागरिकांना प्राप्त झाली आहे.

अर्जदारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध
महागृहनिर्माण योजना ऑगस्ट – २०२२ च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम १५ दिवसांच्या कालावधीमध्ये परत केली जाईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -