घरताज्या घडामोडीछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांमुळे भारत...'; राज्यपाल कोश्यारींकडून महाराजांबद्दल कौतुकोद्गार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांमुळे भारत…’; राज्यपाल कोश्यारींकडून महाराजांबद्दल कौतुकोद्गार

Subscribe

छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. मात्र, शिवाजी महाराजांची प्रशंसा करण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारींनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात भाष्य करतान राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते.

छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. मात्र, शिवाजी महाराजांची प्रशंसा करण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारींनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात भाष्य करतान राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं. तसेच, राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले. याशिवाय त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे. (after controversial statement maharashtra governor bhagat singh koshyari praised chhatrapati shivaji maharaj in mumbai)

बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात भाष्य करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे. भारताची संस्कृती आजरामर आहे. तसेच, भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या माणसांनी देशाला समृद्ध केले आहे”, असे कोश्यारींनी म्हटले. “भारतातील क्रांतीकारी लोकांमुळेच भारत आज स्वाभिमानाने जगात उभा आहे. या क्रांतिकारी लोकांमुळे देशाची संस्कृती जगभरात अमर आहे”, असेही कोश्यारी यांनी म्हटले.

- Advertisement -

याआधी, भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी, शरद पवार यांची तुलना केली होती. त्यामुळे राज्यात प्रचंड वाद उफाळून आला होता. शिवसेने काँग्रेस, राष्टवादी पक्षांकडून राज्यपाल आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. “हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीला नकोत!”, असे म्हणत आव्हाडांनी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केला होता.


हेही वाचा – वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान; म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -