घरनवी मुंबईतुर्भेतील नाकाबंदीत ६१ लाखांचा साठा जप्त; पानमसाल्याचे गुजरात कनेक्शन

तुर्भेतील नाकाबंदीत ६१ लाखांचा साठा जप्त; पानमसाल्याचे गुजरात कनेक्शन

Subscribe

नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर प्रतिबंधीत पानमसाला, गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचे अनेक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तुर्भेत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत  नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड परिसरात गुजरात राज्यातून मागविण्यात आलेला  प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला  आणि गुटख्याचा ६१ लाख ८१ लाख ४६४ रुपयांचा साठा  पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्रिकुटासह विक्रीसाठी वापरण्यात येणारे तीन वाहने देखील ताब्यात घेतली आहेत.

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर प्रतिबंधीत पानमसाला, गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचे अनेक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तुर्भेत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत  नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड परिसरात गुजरात राज्यातून मागविण्यात आलेला  प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला  आणि गुटख्याचा ६१ लाख ८१ लाख ४६४ रुपयांचा साठा  पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्रिकुटासह विक्रीसाठी वापरण्यात येणारे तीन वाहने देखील ताब्यात घेतली आहेत.
गुटखा बंदी असतानाही राज्यात छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली  मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार तुर्भे पोलिसांनी महापे चेक पोस्ट येथे १९ फेब्रुवारी रोजी नाकाबंदी दरम्यान तपासणी करत असताना आढळलेल्या एका टेम्पाते (एम.एच.४६ बी.एम-९४६२) प्रतिबंधीत ११ लाख ९६ हजारांचा केसरयुक्त विमल पानमसाला जप्त करुन गुन्हा दाखला केला होता.सदर गुन्हयाच्या अनुषंगाने गुजरात येथून कंटेनरद्वारे गुटखा मागवून त्याची ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रायगड येथेे विक्रीसाठी आणण्यात आला होता. तुर्भेच्या गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना २२ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीतील ऑर्चिड क्राऊन पलावा सीटी येथून गुटखा व पान मसाल्याने भरलेला टेम्पो (एम.एच.०५ डी.के-७८२९ आणि मानपाडा एमआयडीसीतील पिंपळेश्वर मंदिर परिसरातून तिसरा आयशर कंटेनर (जी.जे.०१ के.टी-११३३) हा प्रतिबंधीतसाठा असणारा ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या तपासात गुजरात राज्यातून गुटखा, पानमसाला विक्रीसाठी आणण्यात येत असल्याचे समोर आले आहे.  पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल छडा लावण्यात गुटखा विक्रीचे रॅकेट उध्दवस्त केले आहे. पोलिसांनी विक्रीकरीता वापरण्यात येणारी २० लाखांची वाहने आणि  १२७ गोणी तंबाखू, १४प्लास्टिक गोण्यात गोल्ड-९००० पान मसाला, विमल पानमसाला साठा हस्तगत केला आहे.
नवी मुंबईत आणून इतरत्र विक्री करण्यासाठी आणलेला गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य प्रतिबंधीतसाठा गुजरात राज्यात कुठे आहे त्या ठिकाणचा शोध घेऊन यात सहभागी असणार्‍या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी असणार्‍या आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

गुजरात कनेक्शन;पोलिसांचे वाढले टेन्शन
मागील तीन वर्षापासून अनेकदा नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुजरात मार्गी नवी मुंबईत विक्रीसाठी आल्याचे निष्पन्न झाले आहे.छुप्प्या पध्दतीने येणारा प्रतिबंधीत पानमसाला, गुटखा व सुगंधी तंबाखू पोलिसांनी पकडल्यानंतरही शहरातील पानटपर्‍यांवर सहजतेने मिळत असल्याचे नवी मुंबईत पाहावयास मिळते. त्यामुळे या पदार्थांची छुप्या मार्गाने होत असलेली खरेदीविक्री रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.तर आतापर्यंतच्या कारवाईत गुजरात राज्यातील तस्करीचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आधीच सायबर व  इतर गुन्हे वाढलेले असताना गुटखा, पानमसल्यानेही नवी मुंबई पोलिसांचे टेन्शन वाढले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -