घरनवी मुंबईऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याकडे ‘पोहून’ लक्ष वेधण्याचा प्रयत्न

ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याकडे ‘पोहून’ लक्ष वेधण्याचा प्रयत्न

Subscribe

ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची दुरावस्था होऊनही त्याचे संवर्धन होत नाही.किल्ल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवजयंती उत्सवानिमित्त सेक्रेड हार्ट स्कूल - कल्याणचे १४ विद्यार्थी मुरुड-राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला ते ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्लापर्यंत समुद्रातून पोहून शिवरायांना अभिवादन केले. खवळलेल्या समुद्रातून १२ ते १८ वयोगटातील मुलांनी पद्मदुर्ग किल्ला ८ किलोमीटरचा अंतर पोहत गेल्याने सर्वंच स्थांरावर कौतुक होत आहे. त्याचवेळी किल्ल्याजवळ घटनास्थळी उपस्थित असलेले मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्याकडे गॉगल, टोपी, स्विमिंग सुट नसताना परंतु मुलांचा उत्साह वाढविण्याकरिता जंजिरा किल्ला ते पद्मदुर्ग किल्ला समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि न थांबता अंतर पार केले.

मुरुड: ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची दुरावस्था होऊनही त्याचे संवर्धन होत नाही.किल्ल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवजयंती उत्सवानिमित्त सेक्रेड हार्ट स्कूल – कल्याणचे १४ विद्यार्थी मुरुड-राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला ते ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्लापर्यंत समुद्रातून पोहून शिवरायांना अभिवादन केले.
खवळलेल्या समुद्रातून १२ ते १८ वयोगटातील मुलांनी पद्मदुर्ग किल्ला ८ किलोमीटरचा अंतर पोहत गेल्याने सर्वंच स्थांरावर कौतुक होत आहे. त्याचवेळी किल्ल्याजवळ घटनास्थळी उपस्थित असलेले मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्याकडे गॉगल, टोपी, स्विमिंग सुट नसताना परंतु मुलांचा उत्साह वाढविण्याकरिता जंजिरा किल्ला ते पद्मदुर्ग किल्ला समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि न थांबता अंतर पार केले. अधिकारी शारीरिक सुदृढ असावेत हे उदाहरण भुसे यांनी दाखवून दिले, त्यांचेही कौतुक होत आहे.जंजिरा किल्ला ते पद्मदुर्ग किल्ला पार गेल्यानंतर मुलांचे शिवगर्जनेत स्वागत केले तसेच किल्ल्यात जाऊन भगवा ध्वज फडकून सांगता केली.
या उपक्रमात कल्याणचे सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अमोदिनी तोडकर, समृद्धी शेट्टी, तृष्णा शेट्टी, अद्विता जोडकर, अभिप्रीत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धार्थ पात्रा, मयंक पात्रा, निनाद पाटील, समर मोहोपे, शिक्षक रामचंद्र म्हात्रे , काशीनाथ मोहोपे, संदीप तोडकर, देवेन्द्र साळुंखे, निलेश पाटील हे सहभागी झाले.मुलांच्या सोबत किल्ल्यात जाण्यासाठी प्रकाश सरपाटील ,गजानन सरपाटील व बंधू सरपाटील यांनी बोट उपलब्ध करून मदत केली.

गड, किल्ल्यांकडे आताच्या पिढीचे दुर्लक्ष
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या गड-किल्ल्यांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. या उपक्रमामुळे जलदुर्गाकडे लोकांचे लक्ष वेधावे आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळावी अशा उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती सेक्रेड हार्ट शाळेच क्रीडा शिक्षक रामचंद्र म्हात्रे यांनी दिली.

- Advertisement -

मुख्याधिकारी भुसे यांनी पद्मदुर्ग किल्ला ठिकाणी आल्यानंतर किल्ल्याची दुरवस्था पाहिली आणि म्हणाले की महाराजांनी बांधलेला किल्ल्याचे संवर्धन आणि जतन झाले पाहिजे.या करिता शासनाकडे पाठपुरावा करू तसेच पद्मदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करु.
– पंकज भुसे,
प्रशासक तथा मुख्याधिकारी, मुरुड जंजिरा नगरपरिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -