मराठी भाषेचा अभिमान बाळगा; ज्येष्ठ साहित्यिक प्रा.एल.बी.पाटील यांचे आवाहन

मराठी भाषेचा गौरव म्हणजे आपल्या आईचा गौरव आहे. मातृभाषा श्रेष्ठ आहे. मराठी भाषा ही आपली आई आहे तिचा अभिमान बाळगा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य,कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख प्रा.एल.बी. पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कामोठे- पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त’’मराठी भाषेचे संवर्धन’ या विषयावरील व्याख्यानाच्यावेळी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.एल.बी.पाटील लिखित सारेबाराचा पलाट हा काव्यसंग्रह सुषमा पाटील विद्यालयाचे डॉ.मंदार पनवेलकर यांच्याकडे शाळेला सप्रेम भेट देण्यात आला.

पनवेल:  मराठी भाषेचा गौरव म्हणजे आपल्या आईचा गौरव आहे. मातृभाषा श्रेष्ठ आहे. मराठी भाषा ही आपली आई आहे तिचा अभिमान बाळगा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य,कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख प्रा.एल.बी. पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कामोठे- पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त’’मराठी भाषेचे संवर्धन’ या विषयावरील व्याख्यानाच्यावेळी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.एल.बी.पाटील लिखित सारेबाराचा पलाट हा काव्यसंग्रह सुषमा पाटील विद्यालयाचे डॉ.मंदार पनवेलकर यांच्याकडे शाळेला सप्रेम भेट देण्यात आला.

पनवेल जवळील कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये झालेल्या या व्याख्यान कार्यक्रमासाठी सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार पनवेलकर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, साहित्यिक कवी स्मिता गांधी, रामदास गायधने,विलास पुंडले, देवेंद्र इंगलकर ,जुने जानते कलाकार बाळू देसाई,सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बबन काटकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश म्हात्रे, मुख्याध्यापिका मोहिनी वाघ आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना प्रा.एल.बी. पाटील म्हणाले,मराठी भाषेला प्राचीन इतिहास आहे.मराठीवर आज अतिक्रमण होत आहे.संस्कृती बदलत चालली आहे त्याप्रमाणे भाषाही बदलत चालल्या आहेत.बोलीभाषांचे शुद्धीकरण होत आहे.बोलीभाषा बोलली पाहिजे कारण ती आपली प्रमाण भाषा आहे. मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. मराठी भाषेमुळे आपले अस्तित्व आहे ते आपण जपलं पाहिजे असे त्यांनी सांगितले.
शेवटी उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका अनिता गायकवाड यांनी मानले.या कार्यक्रमास विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सविता जाधव,अरुणा म्हात्रे, पात्रा सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश म्हात्रे यांनी केले.

मराठी भाषा ही आपली ताकद

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, आपल्या दैनंदिन व नियमित कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने झाला पाहिजे तिचे संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम-उपक्रम होतात अशा कार्यक्रमातून आजच्या तरुणाईला त्याचे महत्त्व निश्चितच कळेल असे सांगून मराठी भाषा ही आपली ताकद आहे,आपली संपत्ती आहे तिचे जतन केलं पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी कवी रामदास गायधने यांनी माय मराठी ही कविता सादर केली.