घरनवी मुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

Subscribe

शहरातील एसटी बस आगाराजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून, या पुतळ्याच्या सभोवताली संसद भवनाची प्रतिकृती उभारली जाणार आहे.

शहरातील एसटी बस आगाराजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून, या पुतळ्याच्या सभोवताली संसद भवनाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. १४ एप्रिलपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस असून, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी येथील कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. पनवेल महानगर पालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर व सत्ताधारी भाजप, आरपीआय, संस्थांनी मागणी व आग्रह धरला. त्या अनुषंगाने या कामांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या १ मार्च २०१९ रोजी मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या सभेत निविदांना मान्यता देण्यात आली होती.

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभिकरण काम सुरु आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. काम वेगाने आणि चांगल्या दर्जाने होत त्याबद्दल समाधानी आहे.
– परेश ठाकूर, सभागृहनेते, पनवेल महानगरपालिका

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरणाचे काम पूर्ण होऊन मागील महिन्यात लोकार्पण झाले. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. या कामाची आयुक्त सुधाकर देशमुख व सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक तेजस कांडपिळे, शहर अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. शहरातील छत्रपती महाराज पुतळ्याचे केलेले सुशोभीकरण अत्यंत विलोभनीय आहे, त्याच धर्तीवर ५५ लाख रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण होत आहे. या ठिकाणी संसद भावनांची प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरु असून त्यावर डॉ. बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच महाड चवदार तळे सत्याग्रहाचे तैलचित्र या ठिकाणी रेखाटण्यात येणार आहे.

हेही वाचा – 

‘जनाची नाही, किमान मनाची बाळगा’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -