घरनवी मुंबईअखेर केमस्पेक मधील कामगारांना पगारवाढ

अखेर केमस्पेक मधील कामगारांना पगारवाढ

Subscribe

तीन वर्षासाठी झालेल्या या करारानुसार कामगारांना पहिल्या वर्षी ९२५०, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी १६२५ रुपयांची अशी एकूण दरमहा १२ हजार ५०० रुपयांची पगारवाढ

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील केमस्पेक केमिकल कंपनीमधील कायमस्वरूपी कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करार येथे संपन्न झाला. तीन वर्षासाठी झालेल्या या करारानुसार कामगारांना पहिल्या वर्षी ९२५०, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी १६२५ रुपयांची अशी एकूण दरमहा १२ हजार ५०० रुपयांची पगारवाढ तसेच मेडिकल पॉलिसी, २० टक्के बोनस, ५० हजार रुपये बिनव्याजी कर्ज, आदी सुविधा या कामगारांना देण्यात येणार आहे.

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या करारनाम्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, केमस्पेकचे व्यवस्थापक राजेंदर हारकरा, अनुराग तिवारी, संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रविंद्र नाईक, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, राजेंद्र कारेकर, रामदास गोंधळी, कामगार प्रतिनिधी संतोष घरत, अंकुश भोईर, आतिष भगत, जीवन भोईर, रुपेश ठाकूर, बळीराम भोईर, आदी उपस्थित होते.

- Advertisement -

कामगार जगला तर कारखाने जगतात, त्यामुळे कामगारांना त्याचे न्यायिक हक्क मिळाले पाहिजेत, त्याचबरोबर कारखान्यांची प्रगतीही झाली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका कायम असते. त्यामुळे आम्ही कामगारांच्या हक्कांसाठी सदैव पाठीशी आहोत. कंपनी आणि कामगार यांनी प्रगतीसाठी हातात हात घालून काम करणे क्रमप्राप्त आहे. कामगार कंपनीच्या नफ्यात भर पाडण्यासाठी सहकार्य करीत आले आहेत यापुढेही करतील.
– आमदार प्रशांत ठाकूर

कामगार आणि कंपन्यांचे विकासासाठी नाते अतूट रहावे, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना प्रयत्नशील आहे. कामगारांच्या उन्नतीसाठी काम करीत आहे, त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.कोविडच्या कठीण परिस्थितीत आपल्या युनिटच्या कामगारांनी कंपनी सुरु ठेवण्याची आणि उत्पादन वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे या युनिटच्या कामगारांचा अभिमान वाटतो.
– कामगार नेते जितेंद्र घरत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -