घरनवी मुंबईसंपामुळे एपीएमसीत परराज्यातील आवक घटली, पालेभाजी महागली

संपामुळे एपीएमसीत परराज्यातील आवक घटली, पालेभाजी महागली

Subscribe

नवी मुंबई-: केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या मोटार वाहन कायद्यामुळे ट्रक चालकांमध्ये संतापाची लाट पसरली असून देशात जड-अवजड वाहन चालकांनी आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी उलाढाल असलेल्या तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) कांदा-बटाटा, फळ, धान्य, मसाला, भाजीपाला या पाचही मार्केटवर परिणाम झाला आहे. (Due to the strike, foreign arrivals in APMC decreased, leafy vegetables became expensive) देशासह, राज्यभरातून मुंबई कृषी उत्पन्न बाजर समिती मध्ये दीड हजाराहून अधिक ट्रक येतात. परंतु सध्या सुरु असलेल्या ट्रक चालकांच्या संपामुळे परराज्यातून येणार्‍या गाडया कमी झाल्याने मालाची आवक घटली आहे.

एपीएमसीच्या भाजीपाला मार्केट यार्डात दैनंदिन ६०० गाडयांची आवक बाजारात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब, गुजरात राज्यातून येते. मात्र सर्वत्र माल वाहक वाहन चालकांनी संप पुकारल्याने मंगळवारी ४६० गाडयांची आवक झाली आहे. त्यात परराज्यांतील घट झालेल्या मालाची संख्या अधिक आहे. परराज्यातून एपीएमसीत येणारा वाटणा, कोबी, गाजर, फ्लॉवरची आवक कमी झाली आहे, असे भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Truck Drivers Protest : वाहनचालकांकडून पालघरमध्ये चक्काजाम; संपामुळे इंधनटंचाई

भाजीपाला २५ टक्के आवक कमी 
किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचे दर चढेच होते. बाजारात आवक न झाल्यामुळे शिल्लक असणारा माल हा वीस ते पंचवीस टक्के अधिक दराने विकला जात होता. तर कांदा-बटाटा मार्केटमध्ये दैनंदिन १२५ ते १५० गाडयांची आवक होत असते. मात्र ११० गाडयांची आवक झाली आहे.

- Advertisement -

कांदा-लसूण बाजार स्थिर
गाडयाची आवक जरी कमी झाली असली तरी अद्याप कांदा-बटाटा, लसूण यांच्यावर कोणताच परिणाम तुर्तास झालेला नाही. पण संप असाच सुरु राहिल्यास कांदा-बटाटा आणि लसणाचे भाव वाढण्याची शक्यता कांदा- बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी व्यक्त केली आहे.

फळांचे दर तुर्तास स्थिर
एपीएमसीच्या फळ बाजारात रोज सुमारे २०० गाडयांची आवक होत असते. मात्र संपामुळे यात घट होते. १८० च्या सुमारास गाडया बाजारात दाखल झाल्या. पण थंडीमुळे फळांना जास्त उठाव नसल्यामुळे फळांचे दर स्थिर असून अद्यापपर्यत ट्रक चालकांच्या संपाचा कोणताच परिणाम झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -