Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई ऐरोलीसह घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

ऐरोलीसह घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने ऐरोली व घणसोली कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली.

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने ऐरोली व घणसोली कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये ऐरोली विभागातील सेक्टर ३ मध्ये भूखंड क्रमांक जे-२६७, जे-२७७, जी-१३१ व डि-४ या ठिकाणी तळमजला (प्लस २) मजली इमारतीचे बांधकाम महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. नोटीशीस अनुसरून हे अनधिकृत बांधकाम संबंधितांनी स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.

या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत धडक मोहिमेचे आजोयन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे. या धडक मोहिमेसाठी ऐरोली विभागातील अधिकारी, कर्मचारी, ३ मजूर, १ गॅस कटर, २ इलेक्ट्रीक हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

- Advertisement -

त्याचप्रमाणे घणसोली विभागातील शिवाजी तलाव परिसर, घणसोली गाव येथे आरसीसी तळमजला कॉलमचे बांधकाम महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामास घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये या नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांने केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.

या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आजोयन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी, कर्मचारी, मजूर १०, ब्रेकर २, गॅस कटर १, जेसीबी १ तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

हेही वाचा –

- Advertisement -

प्रवीण परदेशी परतले राज्यात, पदभार सांभाळणार केंद्रात

- Advertisement -