घरनवी मुंबईऑनलाईन फसवणुकीचा शोध घेण्यात नवी मुंबई सायबर सेलला यश

ऑनलाईन फसवणुकीचा शोध घेण्यात नवी मुंबई सायबर सेलला यश

Subscribe

दोन गुन्हयात तिघांना अटक;बँकेतील ३५ लाखाहून अधिक रक्कम गोठवली

नवी मुंबई-: शहरामध्ये वाढते ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे लक्षात घेता सायबर सेलने अशा घटनांचा शोध घेत कंबर कसल्याचे दिसत आहे. शेअर्स बाजारामध्ये खरेदी-विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा फायदा देण्यासाठी बनावट अ‍ॅपवरुन आणि चांगल्या आर्थिक परताव्याचे अमिष दाखवत फसवणुकीच्या या दोन घटनेत ७३ लाख ७२ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. ( 73 lakhs by investing in the stock market) या प्रकरणी सायबर सेलने कसोशिने तपास करीत तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे.

नवी मुंबई राहणार्‍या एका इसमास शेअर्स खरेदी-विक्रीत गुंतवणुक करुन अधिक नफा मिळवा असे आमिष दाखवून बनावट अ‍ॅपवरुन तक्रारदाराकडून वेगवेगळया बँक खात्यावर ऑनलाईने पैसे भरणा करण्यास सांगून गुंतवणुकीची रक्कम परत न करता २९ लाखांची फसवणुक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मिरारोड येथे राहणार्‍या पियुष लोढा याला ताब्यात घेतले.अधिक चौकशीत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेते शेअर बाजारात अधिक पैसे मिळवि, अशी बतावणी करुन ४४ हजार ७२ हजाराला गंडा घालणार्‍या यशराज कॉप्लेक्स कामोठे येथील निलेश इंगवले या आरोपीला सायबर सेलने अटक केली. पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात कामोठे येथे दुध व वाहन विक्रीचा व्यवसाय करणारा त्याचा साथीदार संजय पाटील याला देखील अटक केली. या दोघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मोबाईल, सिमकार्ड, विविध बँकांचे एटीएम, पॅनकार्ड, रबरी स्टॅम्प जप्त केले आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शाखा अमित काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे)धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वपोनि गजानन कदम, पो.उप.निरीक्षक लिंगराम देवकत्ते व रोहित बंडगर, एकनाथ बुरूंगले, नरहरी क्षीरसागर, विजय आयरे, संदेश गुजर, रविराज कांबळे यांनी केली आहे.

  • बँकेतील ३५ लाखाहून अधिक रक्कम गोठवली
    पियुष लोढा याने ऑनलाईन पैसे भरण्यासाठी फिर्यादीला दिलेल्या सर्व बँकेतील खाते सील करण्यात आली असून या प्रकरणातील १६ लाख ७१ हजार ७५० रुपये तर दुसर्‍या घटनेतील आरोपींच्या विविध बँकेतील १८लाख ५१ हजार ५११ रुपये गोठविण्यात आले आहेत.
  • आरोपींचा ४२ गुन्हयात सहभाग
    आरोपी पियुषचा महाराष्ट्रासह विविध राज्यात एकुण ३२ सायबर तक्रारीमध्ये त्याच प्रमाणे निलेश इंगवले व संजय पाटील याच्यावर १० सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याचे निपन्न झाले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -